खळबळजनक! मुदत संपण्यापूर्वीच सलाइन थेट डस्टबिनमध्ये?...रुग्णालयाचा भोंगळ कारभार

saline.jpg
saline.jpg
Updated on

नाशिक : (सटाणा) येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या डी ५ सलाइनची मुदत संपण्यापूर्वीच त्याची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता. १६) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उघडकीस आणला. या प्रकारामुळे सटाणा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

असा आहे प्रकार

सटाणा ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी सकाळी दहाला उपचारासाठी दाखल असलेल्या एका बेवारस महिलेची चौकशी करण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, अनिल सोनवणे, माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, मनसेचे मंगेश भामरे आदी पदाधिकारी ग्रामीण रुग्णालयात आले होते. अरविंद सोनवणे यांना १५ ते २० खोक्यांमधील डी ५ सलाइन एका ड्रममध्ये ओतली जात असल्याचे निदर्शनास आले. एका खोक्यात साधारणतः २० सलाइन असल्याने जवळपास ३०० सलाइनची विल्हेवाट लावण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार बघून श्री. सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी रुग्णालयात चौकशी केली असता सर्व सलाइन कालबाह्य झाल्या असून, त्यांची मुदत (एक्सपायरी) संपल्याने नेहमीप्रमाणे त्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील औषधसाठा विभागाच्या प्रमुख श्रीमती वनवे यांनी सांगितले. 

तोपर्यंत औषध भांडारगृहाचे दोन वॉर्ड सील

मात्र, पदाधिकाऱ्यांनी सलाइनची पाहणी केली असता त्यावर जुलै व नोव्हेंबर २०२० अखेर मुदतीची (एक्सपायरी) तारीख होती. त्यामुळे मुदत न संपताच सलाइनची विल्हेवाट लावत असल्याचे पाहून आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे रुग्णालयास भेट देऊन या प्रकाराची चौकशी करणार आहेत. तोपर्यंत रुग्णालयातील औषध भांडारगृहाचे दोन वॉर्ड सील करण्यात आले आहेत. 

औषध भांडारगृहात शासनाकडून नियमित येणाऱ्या औषध साठ्यापैकी काही औषधांची मुदत संपते. अशी औषधे नष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. हे काम वेळोवेळी करावे लागते. त्याप्रकारे डी ५ सलाइनची मुदत संपणार होती, म्हणून त्या नष्ट करण्यात आल्या. - डॉ. नामदेव बांगर (वैद्यकीय अधीक्षक, सटाणा ग्रामीण रुग्णालय) 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.