आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज

control room.jpg
control room.jpg
Updated on

नाशिक : संपूर्ण शहर नजरेच्या एकाच टप्प्यात आणण्यासाठी स्मार्टसिटीअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कमांड कंट्रोल सेंटरचे काम पूर्णत्वास आले असून, नोव्हेंबरच्या मध्यापासून केंद्र कार्यान्वित होईल. शहरात बसविल्या जाणाऱ्या ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पर्यावरण, पूरस्थिती, आपत्कालीन कॉलसह शहरात एकाच वेळी संयुक्त संदेश पोचविण्याची व्यवस्था होणार आहे. 

आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात 
शहरातील विविध घटकांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी स्मार्टसिटीअंतर्गत कमांड कंट्रोल सेंटर उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, पंचवटी विभागीय कार्यालय व पोलिस आयुक्त कार्यालयात दोन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. दोन्ही सेंटरमध्ये प्रत्येकी आठ व्हिडिओ वॉल उभारण्यात आले आहेत. व्हिडिओ वॉलवर शहरातील एएमआर स्काडा वॉटर मीटर, सीसीटीव्ही, स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाइट, स्मार्ट पार्किंग, बस सर्व्हिस वाहतूक यंत्रणेसाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आदी सेवा विविध सेन्सर्स व ऑप्टिकलच्या माध्यमातून सेंटरशी जोडून संयुक्त व्यासपीठावर आणल्या जाणार आहे.

स्मार्टसिटीअंतर्गत कमांड कंट्रोल सेंटर सज्ज; नोव्हेंबरमध्ये कार्यान्वित 

या प्रणालीचे डेटाबेसचे पृथ्थकरण करून शहरातील विविध सर्व्हिस नियंत्रित केल्या जाणार आहेत. स्काडा वॉटर प्रणालीमधील बिघाड तत्काळ सेंटरमध्ये समजल्यानंतर दुरुस्त करण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने संपर्क करण्याची व्यवस्था आहे. शहरातील सर्व पथदीप चालू किंवा बंद आहे की नाही, हे समजण्याबरोबरच त्यावर नियंत्रण करणे शक्य होणार आहे. फ्लड सेन्सर्समुळे गोदावरी नदीची धोक्याची पातळी तत्काळ समजून संबंधित विभागांना माहिती मिळेल. पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरा व व्हर्च्युअल इंटेलिजन्सद्वारे अपराधांवर प्रभावी नियंत्रण करणे शक्य होईल. 

या सेवा होणार कनेक्ट 
शासनाच्या महाआयटी कंपनीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही बसविल्यानंतर कमांड कंट्रोल सेंटरला जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर ईमर्जन्सी कॉल बॉक्स, वायफाय, शहरातील चाळीस वाहतूक चौकांसाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, डाटा सेंटर, डेटा रिकव्हरी सेंटर, सिटीझन एक्सपिरियन्स सेंटर, इंटिग्रेटेड पोर्टल व मोबाईल ॲप, स्मार्टसिटी ऑपरेशन सेंटर, हेल्प डेस्क या सेवा कमांड कंट्रोल सेंटरद्वारे नियंत्रित केल्या जाणार आहेत. 

असे आहेत फायदे 
- शहरातील सर्व पथदीपांवर नियंत्रण होणार 
- फ्लड सेन्सरमुळे नदीच्या धोक्याची पातळी समजणार 
- व्हर्च्युअल इंटलिजन्सद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण 
- पीटीझे व एएनपीआर पार्किंगचा डेटाबेस मिळणार 
- पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे चौकांमध्ये धोक्याची सूचना देणे शक्य 
- ४० वाहतूक चौकांसाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम 


कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याबरोबरच स्मार्टसिटीअंतर्गत ज्या सेवा दिल्या जाणार आहेत. त्या नजरेच्या एकाच टप्प्यात आणल्या जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये सेंटर पूर्ण कार्यान्वित होईल. -प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी  
 

संपादन - रमेश चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.