धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती?

doctor image.jpg
doctor image.jpg
Updated on

नाशिक / सटाणा : शहरातील नामपुर रस्त्यावरील परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशा प्रकारे खोटी देऊन अफवा पसरवणे आणि प्रशासनाची दिशाभूल केल्याबद्दल एका कथित डॉक्टरविरोधात सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.  

याबाबतची सविस्तर माहिती अशी  
गुरुवारी (ता.३०) रात्री १०.४० वाजता मोबाईलद्वारे सटाणा पोलिस ठाण्याच्या दूरध्वनीवर पोलिस शिपाई कृष्णा गोडसे यांना एक फोन आला. "मी डॉ.विकास माणिक अहिरे बोलतोय. सटाणा-नामपुर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएमच्या पाठीमागे मोबाईल टॉवरजवळ एक डॉक्टर बाहेरून आलेला असून तो कोरोना बाधित आहे." अशी माहिती फोनवरुन बोलणार्‍या व्यक्तीने दिली. त्यामुळे पोलिस शिपाई गोडसे हे पोलिस हवालदार कैलास खैरणार यांना सोबत घेऊन पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नामपुर रस्त्यावरील संबंधित ठिकाणी गेले. मात्र त्या ठिकाणी काहीही आढळून न आल्याने डॉ.विकास अहिरे यांच्या मोबाईलला पुन्हा फोन करून माहिती घेतली. त्यांनी मोबाईल टॉवरजवळ माझा चुलत भाऊ संजय दौलत अहिरे हे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार संजय अहिरे यांच्याकडे चौकशी केली असता डॉ.विकास अहिरे हा माझा चुलत भाऊ असून तो दारू पिऊन आम्हाला विनाकारण त्रास देतो आणि वारंवार धमक्या देतो. आमच्या घराजवळ कोणताही कोरोना बाधित रुग्ण नाही अथवा बाहेर गावाहून आलेला नाही, असेही संजय अहिरे यांनी सांगितले. 

दिशाभूल व अफवा पसरवून त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल 
फोनवरून मिळालेली संपूर्ण माहिती खोटी असल्याचे समोर आल्याने पोलिस शिपाई कृष्णा गोडसे यांच्या फिर्यादीनुसार डॉ.विकास माणिक अहिरे (रा.नाशिक किंवा जळगाव) याच्या विरोधात विनाकारण पोलिस आणि इतर शासकीय यंत्रणेला खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणे आणि अफवा पसरवून त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांनी खोटी माहिती व अफवा पसरवू नये.

कोरोना संदर्भात खोटी माहिती व अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र हे माहीत असूनही काही नागरिक खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल. नागरिकांनी खोटी माहिती व अफवा पसरवू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. - नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक, सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.