संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

wedding 1.jpg
wedding 1.jpg
Updated on

नाशिक / मालेगाव : ग्रामीण भागातील उपवर तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यातच शेतकरी तरुणांची स्थिती आणखी बिकट आहे. यातूनच दलालांच्या माध्यमातून अगदी चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीला मुलगी मिळत नव्हती. म्हणून चक्क कायद्याचेच उल्लंघन करून मनमानी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

असा घडला प्रकार
गाळणे येथील ललीत या चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाला मुलगी मिळत नव्हती. यातूनच त्याने नवपाडा येथील संगीता ठाकरे (वय १६) या मुलीशी, ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही विवाह केला. हा विवाह लावून त्यास उपस्थिती लावणारे मुलीचे वडील कन्हय्यालाल ठाकरे, ज्ञानू बागूल, गोकुळ भोये (तिघे रा. नवपाडा, ता. साक्री) व पिंटूतात्या भदाणे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीशी ललीतने विवाह केल्याचा तक्रार अर्ज वडनेर खाकुर्डी पोलिसांना प्राप्त झाला होता. या अर्जाची पोलिस निरीक्षक रामेश्‍वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद सोनवणे व सहकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळून आल्याने आबा अहिरे (रा. कुसुंबा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

यापूर्वीही दोन गुन्हे 
ग्रामीण भागातील उपवर तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यातच शेतकरी तरुणांची स्थिती आणखी बिकट आहे. यातूनच दलालांच्या माध्यमातून परराज्य, परजिल्ह्यातील तरुणींशी मोठ्या प्रमाणावर विवाह होत आहेत. यातील काही विवाहांत तरुणांची फसवणूक होते. दलालांची साखळी व मध्यस्थ उखळ पांढरे करून घेतात. प्रसंगी मुली काही दिवस नांदून पळूनदेखील जातात. ‘सकाळ’ने या गैरप्रकारांवर प्रकाशझोत टाकला होता. तालुक्यातही या पद्धतीने फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले होते.  

तक्रार अर्जामुळे बालविवाहाला वाचा फुटली

नवपाडा (ता. साक्री) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह करून बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ललीत मैंद-सोनार (वय ३७, रा. गाळणे) या वरासह मुलीचा पिता, विवाह जुळविणारे मध्यस्थ अशा पाच जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. १७ जुलै २०२० ला विवाह झाला. तक्रार अर्जामुळे बालविवाहाला वाचा फुटली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()