नाशिक : ‘वीर जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘व्यर्थ ना हो बलिदान’ अशा घोषणांनी हुतात्मा वीर जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील व मालेगाव तालुक्यातील निमगुले साकुरी येथील जवान सचिन मोरे हे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव आधी पुणे येथे नंतर नाशिकहून त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात आले. शनिवार (ता.27) सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला होता त्यांचे पार्थिव आधी पुणे येथे नंतर नाशिकहून त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात आले
जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात शहीद
सध्या भारत आणि चीन सीमेवर गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी दोन्ही देशांकडून रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याच ठिकाणी भारताकडून एक पूल बांधणीचे काम सुरु होते. याच वेळी चीनने नदीत पाणी सोडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. नदीला पाणी सोडल्यामुळे तीन जवान वाहून चालले होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन यांनी नदीत उडी घेतली. परंतु नदीतील दगडावर तो कोसळल्याने तो शहीद झाल्याची माहिती सचिनच्या कुटुंबियांना लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
सचिन 17 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. ते इंजिनिअर होते. मागील एक वर्षापासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. सीमेवर पूल, व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन यांना वीरमरण आले.
शहीद जवान सचिन मोरे यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याकडून पुलाचे बांधकाम सुरू असतांना या ठिकाणी सचिन मोरे संरक्षणासाठी कार्यरत होते. दरम्यान, या भागातील नदीला चीनकडून अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढल्याने दोन जवान त्यात वाहून जात होते. त्यांना वाचवण्यासाठी सचिन यांनी पाण्यात उडी घेतली. या वेळी दोघांना वाचवताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.त्यांच्यावर आज त्यांच्या मुळगावी साकोरी झाप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी कृषी मंत्री दादा भुसे,खासदार सुभाष भामरे,खासदार भारती पवार,आमदार सुहास कांदे,माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.