नाशिक : सतत घरात कौटुंबिक कलह.. मद्यपी वडिलांचे आईशी रोज होणारे भांडण, स्वत:ला होणारी मारहाण यास वैतागून सातपूर परिसरातील दहावीतील अल्पवयीन मुलगा पेपरच्या आदल्या दिवशी नववीतील मित्रासह घरातून पळाला. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर भुसावळला जाणाऱ्या गाडीची वाट ते पहात असतानाच "साथी' संस्थेच्या सदस्यांनी त्यांना हेरले आणि त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
असा घडला प्रकार...
दहावीत शिकणाऱ्या या मुलाचा सांभाळ त्याचे काका-काकू करतात. त्याचा बुधवारी विज्ञानाचा पेपर होता. मात्र, वडिल रागावल्याने त्याने शेजारीस राहणाऱ्या नववीत शिकणाऱ्या युवकास मंगळवारी (ता.१७) सकाळी सोबत घेतले. सायकलने ते नाशिकरोड रेल्वे स्थानकात आले. भुसावळला जाणाऱ्या रेल्वेगाडीला उशीर असल्याने ते प्लॅटफार्म दोनवर बसले होते. भूक लागल्याने त्यांचे चेहरेही रडवेले झाले होते. नाशिकरोड रेल्वे स्थानकात वाट चुकलेल्या मुलांचे समुपदेशन साथी ही सामाजिक संस्था करते. संस्थेचे ईश्वर सोनवणे, प्रफुल्ल चंद्रमोरे व सहकारी स्थानकातील प्लॅटफार्मवर गस्त घालतात. एखादा अल्पवयीन मुलगा-मुलगी आढळल्यास त्याला विश्वासात घेतले जाते. त्यांना अशीच ही दोन स्टेशनच्या परिसरात मुले दिसली. कार्यालयात आणून प्रेमाने विचारपूर केल्यावर त्यांनी खरा प्रकार सांगितला. इकडे मुलांचे कुटुंब त्यांना शोधून थकले होते. आई रडकुंडीला आली होती. तेवढ्यात त्यांना 'साथी'ने फोन करून मुले सुखरुप असल्याचे सांगितले. मुलांना घेण्यासाठी आई-वडिल तातडीने रेल्वे स्थानकात आली. कायदेशीर सोपस्कर केल्यावर मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्य निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला सूर्यवंशी, राजपूत, अंकुश चौधरी, सुभाषचंद्र दुबे, साथी संस्थेचे समन्वयक ईश्वर सोनवणे, प्रफुल्ल चंद्रमोरे, प्रिती खरे, संकेत कानवडे, बापू पवार, स्वप्नील थोरात व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.