पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : माकडचाळे, मर्कटलीला असे शब्द उपरोधिक टीकेसाठी वापरले जातात. यात मर्कट मात्र बदनाम होते. पण कधी-कधी हेच मर्कट माणसापेक्षा अधिक समजूतदारपणे वागताना दिसते.
दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले वानरराज
गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या वानराची भूक भागविण्यासाठी पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर मोरे धावले. त्यांनी दिलेल्या अन्नाच्या दोन घासांविषयी कृतज्ञता ठेवत माकडाने बुधवारी थेट मोरे यांच्या मातोश्रींच्या दशक्रिया विधीत हजेरी लावली. एक प्रकारे मोरे यांचे अश्रू पुसण्यासाठीच हे माकड आल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटली.
लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता
गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांअभावी परिसरात सामसूम होती. त्यामुळे परिसरातील पक्षी-प्राणी अन्नाअभावी भुकेने व्याकूळ होत होती. मनात नेहमी भूतदया असणारे पशुप्रेमी सोमेश्वर मोरे यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने त्या प्राण्यांच्या अन्नाची सोय केली. चार-दोन दिवसांनी ते फळे, अन्न माकडांना देत होते. संकटात मोरे यांनी त्या माकडांना दोन घास अन्नाचे देत कणव दाखविली.
संकटात धावलेल्या मोरे यांचे सांत्वन
एखाद्याचे उपकार माणूस विसरतो, पण प्राणी नाही, याची प्रचीती आली. सोमनाथ मोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. बुधवारी दशक्रिया विधीप्रसंगी आप्तस्वकीय जमले. त्याच वेळी एक अनाहूत पाहुणा आला. तो पाहुणा वानर होते. गेल्या वर्षी उपासमारीच्या संकटात धावलेल्या मोरे यांचे सांत्वन करण्यासाठी जणू हे माकड आले. मोरे यांच्या मातोश्रींच्या फोटोजवळ बसले आणि काही वेळानंतर त्याने प्रस्थान केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.