मुलीचा विरह सहन होईना! व्याकूळ मातेचे अखेर टोकाचे पाऊल..

mother daughter 2.jpg
mother daughter 2.jpg
Updated on

नाशिक : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' अशा कवितेच्या ओळी प्रसिद्ध असल्या, तरी मातेची लेकरांविषयीची ओढ जगावेगळी असते. याचा प्रत्यय नुकताच मोरे मळा परिसरात आला. मुलीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या मातेनेही आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना घडून दोन दिवस उलटले असून परिसरात मात्र याच घटनेची चर्चा सुरू असून हळहळ व्यक्त होत आहे.

दुःख हे कुणाला टळत नाही...
मनुष्याला जीवनात सर्व सुखांची अपेक्षा असते मग तो गरीब असो की श्रीमंत, त्या दृष्टीकोनातून त्याची धडपड सुरू असते. त्यात विशेष म्हणजे दुःख हे कुणाला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण ते श्रीमंतांला असो की गरिबाला टळत नाही. बुधवार (ता.5) हनुमान वाडीतील मोरे मळ्यात रामकृष्ण नगर येथे गळफास लावून मुलासह आईने आत्महत्या केल्याची घटना घडली,आणि परिसरात एकच शोककळा पसरली. आजू बाजूला राहणारे नागरिक, महिला हे आत्महत्या केलेली आई सुमन विजय चव्हाण हिची जीवनातील व्यथा वेदनांवर बोलू लागले. त्यात ते म्हणत होते 

सुमनच्या जीवनातील व्यथा वेदना
सुमन हिच्या वैवाहिक जीवनात नवऱ्यासोबत होणाऱ्या वाद-विवादला कंटाळून तिने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. सुमन, मुलगी किरण व मुलगा आदेश सोबत तिच्या आईकडे राहत होते. एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करून उदरनिर्वाह चालवत होती. मुलगी किरण दिसायला सिने अभिनेत्री प्रमाणेच अतिशय सुंदर आणि मुलगा आदेश हा शाळेत प्रचंड हुशार मागील वर्षी जवळपास 95 % मार्क मिळविणारा परिसरातील एकमेव मुलगा होता.आई सुमनचां जीवन संघर्ष सुरू असताना काही वाद विवादामुळे मुलगी किरणला सात महिन्यांपुर्वी नवऱ्याकडे पाठवून दिले होते. परंतु काही कारणास्तव मुलगी किरणने वडिलांकडे असताना गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर सुमन ही मुलगी किरण तिच्या शोकसागरात बुडून गेली होती. तरी कशीबशी वाट काढत ती पुढे चालत होते. परंतु मुलीच्या विरहाने ती मेटाकुटीस आली होती.

मातेची लेकरांविषयीची ओढ

बुधवार (ता.5) रोजी मुलगी किरणचां महिना होता. शोकसागरात बुडालेल्या आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेली आई सुमन हिने ती गेल्यानंतर मुलाचा काय होईल या विचाराने की काय मुलासह स्वतः सुमन हिने जीवन संपवण्याचा निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे मोरे मळ्यात राहणाऱ्यांना घटना समजताच एकच शोककळा पसरली. एकंदरीत या घटनेमुळे प्रत्यय येतो तो 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' अशा कवितेच्या ओळी प्रसिद्ध असल्या, तरी मातेची लेकरांविषयीची ओढ ही जगावेगळी असते हे म्हणणे वावगे ठरणार नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.