रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला 'तो' देवदूतासारखा धावून आला!

auto driver.jpg
auto driver.jpg
Updated on

नाशिक : (अलंगुण) रस्ता अपघातामुळे बेशुद्ध पडलेल्या तरुणाला अनोळखी रिक्षाचालकाने वेळेचे गांभीर्य ओळखून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात वेळेत दाखल करत अनलॉक मोबाईलद्वारे नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली. वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन माणुसकीचे मूल्य जपणाऱ्या रिक्षाचालक देवदूताने तरुणाचे प्राण वाचवले. 

अशी आहे घटना

जखमी जगदीश गांगुर्डे (वय 30) 12 मार्चला सायंकाळी पत्नी भारती व दहा दिवसांच्या लहान परीसह शिवाजीनगर (सातपूर) येथे दुचाकीने जात असतांना चोपडा लॉन्सजवळ गोदावरी पेट्रोलपंपासमोर अज्ञात कारचालकाने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दुचाकीला पाठीमागून धडक दिली. डोक्‍याला व पायाला गंभीर दुखापत झाली. धडक देणारा गाडीचालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला. त्याचवेळी पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले रिक्षाचालक अंकुश चव्हाण (रा. राणेनगर, नाशिक) यांनी मदतीसाठी कोणीही पुढे न आल्याने जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जखमीच्या मोबाईलवरून नातेवाइकांशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. रुग्णाच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे धोका अधिकच वाढला होता. जखमी तरुण नातेवाइकांना ओळखत व बोलतही नसल्याने तत्काळ सीटी स्कॅन करून तातडीने शस्त्रक्रिया केली. 

वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे तरुणास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणे शक्‍य झाले. श्री. चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवून रुग्णाचे प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.