razbiya sanitizer death.jpg
razbiya sanitizer death.jpg

दुर्दैवी! घरात सॅनिटायझरचा उडाला भडका.. महिला पेटली ..सॅनिटायझेशन करताना हादरवणारी घटना

Published on

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर वापराचा आग्रह धरला जातो. मात्र मात्र सॅनेटायझर वापराबाबत अज्ञान असल्यास जीवही गमावावा लागतो. याचा प्रत्यय देणारी दुर्घटना वडाळा शिवारात घडली. या दुर्दैवी घटनेने महेबुबनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एक हादरवणारी घटना...

कोरोनापासून संरक्षण म्हणून मागील चार महिन्यांपासून निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर घराघरांत केला जात आहे. सॅनिटायझरचा अतिरेकी वापरदेखील धोकादायक ठरत असल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांनी दिला आहे. वारंवार सॅनिटायझरचा वापर आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा ठरतो. मेहबुबनगरमध्ये गरीब नवाज मशिदीच्या शेजारी असलेल्या एका चाळीत रजबीया ही विवाहिता पती शाहीद मुलगी अक्सा (३), महेजबीन (६) यांच्यासोबत राहत होती. शाहीद मिळेल ते मोलमोजुरीची कामे करत उदरनिर्वाह करतात तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून रजबीयादेखील लोकांची धुणी-भांडीची कामे करून आपल्या दोन मुलींसह संसाराचा गाडा ओढत होती. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शाहीद यांचे कुटुंब येथील एका पत्र्याच्या शेडवजा घरात राहत होते. कोरोनापासून संरक्षणासाठी गेल्या सोमवारी (दि. २०) रजबीया हिने रात्रीच्या सुमारास ११ वाजता घरात सॅनिटायझर फवारले. यावेळी वीजपुरवठा खंडीत झाल्याने घरामध्ये मेणबत्ती पेटविण्यात आलेली होती. सॅनिटायझरचा मेणबत्तीच्या ज्वालांशी संपर्क झाल्याने आगीचा भडका उडाला. या भडक्यात रजबीयाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने जोरजोरात ओरडत घराबाहेर धाव घेतली असता तत्काळ पती शाहीद व आजुबाजुच्या महिलांनी धाव घेत तिला विझविण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत महिला ९० टक्के भाजली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने खबरदारी म्हणून महिला आपल्या घरात सॅनिटायझरची फवारणी करीत असतांना ही घटना घडली. गेल्या सोमवारी (ता.२०) रात्रीच्या वेळी ती आपल्या घरात सॅनिटायझर फवारणी करीत असतांना विज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे तिने मेणबत्ती पेटवून सॅनेटायझर मारण्याचा प्रयत्न केला असता अचानक भडका उडाला होता. या घटनेत महिला ९० टक्के भाजली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादन - ज्योती देवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()