झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

Young people are turning to crime because of the lure of instant riches Nashik Crime News
Young people are turning to crime because of the lure of instant riches Nashik Crime News
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) :  द्राक्षनगरीत काही दिवसात घडलेल्या घटनांवरून तरुणांना भाईगिरीचे वेड लागले की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. झटपट श्रीमंत व अल्पावधीत प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाई गुन्हेगारीकडे वळल्याचे चित्र आहे. त्यातून व्यसनाच्या आहारी जात आहेत. शिंदे पिता-पुत्राची हत्येचे प्रकरण ताजे असताना धारधार शस्त्र बाळगणारा गुन्ह्याच्या हेतूने बाहेरगाववरून आलेला तरुण आढळला. खलप्रवृत्तीकडे झुकू पाहणाऱ्या तरुणांना वेळीच रोखण्याचे आव्हान कुटुंबे व पोलिस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. 

नऊ वर्षांपूर्वी झालेले कांदा व्यापारी शंकरलाल ठक्कर यांचे प्रकरण राज्यभरात गाजले. पाच कोटींच्या खंडणीसाठी स्थानिक टोळीचे मोरके सचिन कोल्हे व बैरागी यांच्या टोळीने रचलेला डाव पोलिसांच्या कारवाईने उधळून लावला होता. ठक्कर यांचे अपहरणापूर्वी कोल्हे टोळीने शहरात गुन्हे करताना लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. अगोदरचा डाव यशस्वी झाल्याने कोल्हे टोळीने ते धाडसी पाऊल उचलले होते. अंबिकानगर येथे सहा महिन्यांपूर्वी विकी धाडिवाल याने भावाच्या साथीने शिंदे पिता-पुत्राचा खून केला. दोन वर्षांपूर्वी भाऊनगरलगत पारधेवाड्यात तरुणावर टोळीने चाकूने वार केले. वर्षाभरापूर्वी गुन्हेगारी वृत्तीच्या गौरव आकडे याने व्यापारी जुगलकिशोर राठी यांच्यावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी राजरोज चॉपर घेऊन वावरणारा सागर कुचेकर गुंड प्रवृत्तीचा तरुण आढळला. 

पोलिसांना आव्हान 

हे सर्व घटनाक्रम पोलिस यंत्रणेला आव्हान देणारे आहे. या घटनांबरोबरच पोलिस दफ्तरी नोंद नसलेले टोळीयुद्ध काही भागात सुरू असते. गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण करण्याचा हेतू आहे. गुंडगिरीत नाव कमावल्यास खंडणी, वसुली, हप्ता, प्रोटेक्शन मनी आणि चंदा या माध्यमातून बक्कळ पैसा कमावता येतो, अशी धारणा असल्याने १६ ते २१ वर्ष वयोगटातील मुले गुन्हागारी जगाकडे वळत आहेत. झोपडपट्टी वस्ती, व्यवनाधीन आई-वडील, किंवा विभक्त कुटुंबात जगणारी मुले लवकर वाईट संगतीत येऊन व्यसनाधीन होतात. लूटमार, वाटमाऱ्या, चोरी, चेनस्नॅचिंग, घरफोडी असे मार्ग पत्करतात. त्यातून त्यांचे मन गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या भाई किवा दादाकडे वळते. 

पिंपळगाव शहरात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. संबंधित ठिकाणी छापा टाकला जात आहे. मध्यरात्री शहरातील पोलिस गस्त वाढविली आहे. गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून शहराची कायदा व सुव्यव्यस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न आहे. 
- भाऊसाहेब पटारे, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.