BREAKING : 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील अपराधी युसूफ मेमनचा मृत्यु 

yusuf momon 1.jpg
yusuf momon 1.jpg
Updated on

नाशिक : 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व कुख्यात दहशतवादी टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन याचा शुक्रवारी (ता. 26) हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यु झाला. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 

मुंबई बॉम्बस्फोटातील युसूफ मेमन आरोपी
युसूफ अब्दुल रज्जाक मेमन (55,सध्या रा. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, मूळ रा. मुंबई) हा शुक्रवारी (ता. 26) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ब्रश करीत होता. त्यावेळी अचानक युसूफ मेमन चक्कर येऊन पडला. त्यास कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता, उपचारादरम्यान, त्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने त्याचा मृत्यु झाला. याबाबत सरकारवाडा पोलिसात नोंद करण्यात आली असून, नाशिकरोड कारागृहामार्फत शवविच्छेदनासाठी धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे मृतदेह पाठविण्यात आला आहे. 

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी

युसूफ मेमन 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी होता. 2007 मध्ये न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तर, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात युसूफ मेमन आणि त्याचा भाऊ इसाक मेमन या दोघांना गेल्या 2018 पासून आणण्यात आले होते. कुख्यात दहशतवादी टायगर मेमन अद्याप फरार आहे तर त्याचा एक भाऊ याकूब मेमन यास 2015 मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.