Dhule News : आरोग्याच्या विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. शासन जनतेच्या आरोग्याची मोठी काळजी घेत आहे. महिलांच्या जीवनात बाळंतपण म्हणजे पुनर्जन्मच झालाय. बाळासह आईचा पुनर्जन्मच होत असतो.
बहुतेक बाळंतपणे रुग्णालयातच होत आहेत. ज्या काळी या सुविधा नव्हत्या तेव्हा फुलाबाईंनी एकहाती हजारावर बाळंतपणे केली. सुईपण निभावताना एकही बालक दगावले नाहीत.
फुलाबाई दिसल्यावर त्यांना नतमस्तक होणारी शेकड्यावर तरुण गावात वावरत आहेत. या फुलाबाईंना वयाच्या नव्वदीत भुलेक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (1000 happy delivery in 90 years by fulabai dhule news)
नव्वदीत सन्मान
येथील फुलाबाई झाल्टे यांचे वय वर्षे नव्वद आहे. त्यांना कापडणे विविध कार्यकारी सेवा संस्थेने भूलेक सन्मान पुरस्कार देऊन गौरविले. हा सन्मान सोहळा स्वातंत्र्यदिनी संस्थेच्या सभागृहात झाला. संस्थेचे अध्यक्ष राजा पाटील अध्यक्षस्थानी होते.
सरपंच सोनीबाई भिल, उपाध्यक्ष अभिमन माळी, संचालक भटू गोरख पाटील, उज्ज्वल बोरसे, अनिल माळी, शरद पाटील, दिनकर माळी, रवींद्र पाटील, विश्वास पाटील, सुनील पाटील, यशवंत खैरनार, दत्तू माळी, बन्सीलाल पाटील, दिनकर पाटील, प्राचार्य विश्वासराव देसले, छगन पाटील, विलास पाटील, चंद्रकांत पाटील, भय्या पाटील, दादा पाटील, ललित पाटील, विक्की पाटील, योगेश पाटील, महेश पाटील, हरीश पाटील, अमोल पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
फुलाबाई झाल्टे कापडणेच्या लेक. सासर देवभानेचे होते. तरुणपणात विधवापणाचे जिणे त्यांना आले. माहेरी नव्वद वर्षे निघून गेली. माहेरी अठराविश्वे दारिद्र्य होते. मिळेल ते कष्टाचे काम अभिमानाने केले. त्या बाळंतपण करणाऱ्या रेश्मा मावशीच्या संपर्कात आल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्या आज हयात नाहीत. त्या त्या काळी गावातील एकमेव सुईण होत्या. त्यांच्या मदतनीस म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. रेश्माबाई भामरे थकल्या. सारी जबाबदारी फुलाबाईंनी उचलली. वयाच्या चाळिशीपासून त्या सुईण म्हणून काम करू लागल्या आहेत.
एकही बालक दगावले नाही
पन्नास वर्षांत हजारावर सुखरूप बाळंतपणे केली. काही वेळेस गुंतागुंतही निर्माण झाली. पण बालकासह आईलाही दगावू दिले नाही. त्या रेश्माताईंकडून पारंपरिक शास्त्र शिकल्या आहेत. रात्री-अपरात्री दरवाजावर थाप पडली म्हणजे समजायचे, बाळंतपणासाठी आलेत घ्यायला. हातात कंदील घेऊन त्या घरातून बाहेर पडत असत. केवळ बाळंतपणच नाही तर त्या मातेची काळजी घेणारी पारंपरिक आयुर्वेदिक औषधेही सुचवायच्या.
"आजही नैसर्गिक बाळंतपणासाठी विविध उपाय सुचविते. आज आरोग्याच्या सुविधा मोठ्या निर्माण झाल्या, तेवढी गुंतागुंत निर्माण होत चालली आहे. महिलांनी गरोदरपणात हालचाली वाढविल्या पाहिजेत. दररोज कामे केली पाहिजेत. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मोठा सन्मान झाला." -फुलाबाई झाल्टे, कापडणे, ता. धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.