धुळे : क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचारासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेने दहा हजार टॅब्लेट्स उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली. हा औषधसाठा महापालिकेच्या शहर क्षयरोग अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. (10000 Tablets of tuberculosis available at Branch of Indian Medical Association dhule news)
ज्या घरात फुप्फुसांचा क्षयरुग्ण असलेले रुग्ण आहेत अशा घरातील सदस्यांचे क्षयरोगाचे निदान केले जाते. त्यात थुंकीचे नमुने व छातीचा एक्स-रे काढून ज्या सदस्यांना क्षयरोगाची लागण असते अशा सदस्यांना क्षयरोगाचा उपचार दिला जातो, तर ज्या सदस्याचा थुंकी व एक्स-रे रिपोर्ट निगेटिव्ह येतो अशा सदस्यांना क्षयरुग्णाच्या संपर्कात असल्यामुळे भविष्यात क्षयरोग होऊ नये म्हणून टीपीटी म्हणजेच क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार दिला जातो. हा उपचार घरातील प्रत्येक सदस्याला क्षयरुग्णाबरोबर सहा महिने दिला जातो. यात INH 100 Mg, INH 300 Mg ही औषधी दिली जाते.
धुळे महापालिकेच्या शहर क्षयरोग निर्मूलन केंद्राकडे क्षयरोग प्रतिबंधक उपचारासाठी आवश्यक INH 300 Mg टॅबलेटची कमतरता असल्याने त्या पुरविण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनला आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंदार म्हसकर यांच्या पुढाकाराने दहा हजार टॅब्लेट उपलब्ध करून दिल्या. हा औषधसाठा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
या वेळी आयएमचे धुळेचे डॉ. म्हसकर, कार्याध्यक्ष डॉ. महेश अहिरराव, उपाध्यक्ष डॉ. संजय शिंदे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील, पर्यवेक्षक शशिकांत कुवर, पीपीएसएचे मनोहर दुसाने आदी उपस्थित होते. याकामी डब्ल्यूएचओ कन्सल्टंट डॉ. हर्षद लांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. आयएमएच्या या सहकार्याबद्दल महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.