Nandurbar News : 101 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट; जिल्हास्तरीय दूध भेसळ नियंत्रण समिती कारवाई

milk adulteration
milk adulteration esakal
Updated on

Nandurbar News : जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दूध भेसळ नियंत्रण समिती स्थापन केलेली असून या समितीमार्फत नुकतेच जिल्ह्यातील विविध भागात दुधाची तपासणी करून १०१ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली आहे.(101 liters adulterated milk destroyed by District level milk adulteration control committee dhule news)

नंदुरबार शहरी भागातील देसाईपुरा, राजपुत पेट्रोल पंप, कोकणी हिल, संजय नगर, अंधारे स्टॉप आदी परिसरात दूध विक्री संकलन करुन विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले, ठेलावाले यांच्याकडील दुधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाद्वारे करण्यात आली.

९ दूध विक्रेत्यांच्या एकूण सरासरी ४१९ लिटर दुधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची तपासणी करून ४ दूध विक्रेत्याच्या दूध साठ्यामध्ये पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास, चव, कचरा, अस्वच्छता आढळून आली. यामध्ये ९ लिटर गाईचे व ९२ लिटर म्हशीचे असे एकूण १०१ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील दूध विक्रेते व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणे व भेसळ नियंत्रण मोहिमेस मज्जाव करणे हा कायद्याने गुन्हा असून दूध पुरवठादार व दूध विक्रेत्यांनी पाणी किंवा कुठल्याही प्रकारची भेसळ न करता, स्वच्छ दूध हाताळणी व स्वच्छ कार्यपद्धतीचा अवलंब करून विनाभेसळ दूध वाहतुक व वितरण करावे.

milk adulteration
Nandurbar Crime News : पोलिसांनी मद्य तस्कारांच्या आवळल्या मुसक्या; अवैध दारू जप्त

भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य खाद्यपदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. यामुळे भेसळ करणाऱ्या विरोधात भविष्यात दंडनीय व कायदेशीर करवाई करण्यांत येईल. तसेच दूध भेसळ प्रतिबंध समितीच्या कार्यवाहीस अटकाव, अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्ती व आस्थापने विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष धनंजय गोगटे, अपर पोलिस अधिक्षक नीलेश तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मनोज पावरा नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित रमेश पाटील, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन डी. डी. तांबोळी, क्षेत्रसहाय्यक वैध मापनशास्त्र एस. वी. सोनवणे, विस्तार संकलन प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, विजय भदाणे यांनी ही कारवाई केली.

वजनमापाची तपासणी

यावेळी वैध मापनशास्त्र विभाग, धुळे यांच्यासोबत संयुक्त पथकाद्वारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र- यांच्या मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली. त्यातील २ दूध विक्रेत्यांच्या डेअरीतील, वापरातील वजन मापे ही मुद्रांकन व पडताळणी उल्लंघन आढळून आल्याने वैध मापनशास्त्र अधिनियमांतर्गत खटले नोंदविण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील २ दूध नमुने व ४ स्वीट्स नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

milk adulteration
Nandurbar News : जीव धोक्यात घालून प्रवास; अक्कलकुवा तालुक्यात जागोजागी खड्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.