Dhule Municipality News : 11 कोटींवर खर्चाच्या कामांना मंजुरी; मनपा शाळा-20 साठी नवी इमारत,

आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती, महासभा घेण्यात येत आहेत.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिका क्षेत्रात स्थळदर्शक, दिशादर्शक फलक, मनपा शाळा क्रमांक-२० च्या नूतन इमारतीचे बांधकाम, महात्मा फुलेनगर येथे विपश्‍यना केंद्र, महिंदळे शिवारातील शीतल कॉलनीत ग्रंथालय.

श्री सिद्धेश्‍वर गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण यासह रस्ते, गटारी, सभागृह बांधणे आदी सुमारे ११ कोटींवर खर्चाच्या कामांना महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. (11 crore approved in Standing Committee meeting of dhule Municipal Corporation news)

नूतन वर्षात महापालिकेचा संपूर्ण कारभार आयुक्त तथा प्रशासकांच्या हातात आल्यानंतर स्थायी समिती सभेसाठी प्राप्त प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती, महासभा घेण्यात येत आहेत.

गुरुवारी (ता. १) स्थायी समितीची दुसरी साप्ताहिक सभा सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. श्रीमती दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, करमूल्य निर्धारण अधिकारी करुणा डहाळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. सभेपुढे विविध आठ विषय होते. हे सर्व विषय मंजूर करण्यात आले. एकूण ११ कोटी १० लाख ६१ हजार ४४० रुपये खर्चाची कामे यातून मंजूर झाली.

शाळा-२० चा मार्ग मोकळा

आदर्श शाळा विकसित करण्यांतर्गत २०२३-२४ अंतर्गत मनपा शाळा क्रमांक-२० च्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी दोन कोटी १५ लाख ७५ हजार ९७५ रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी मिळाली होती. हा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता.

प्रभागातील माजी नगरसेवक साबीर शेठ यांनी स्थायी समिती सभेत हा प्रश्‍न वारंवार उपस्थित करून कार्यवाहीची मागणी केली होती. शेवटी प्रशासकांच्या अध्यक्षतेखालील सभेत हा विषय मार्गी लागला. या कामासाठी एकूण दोन कोटी १३ लाख ६२ हजार ३७३ रुपये खर्चाची शेकडा ९९ टक्के कमी दराची ए. के. सैफी यांची निविदा मंजूर करण्यात आली.

Dhule Municipal Corporation
Dhule Marathon 2024 : मॅरेथॉन मार्गावर साफसफाई ठेवा : अमिता दगडे-पाटील

विपश्‍यना केंद्र, ग्रंथालय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत महात्मा फुलेनगर भागात विपश्‍यना केंद्र बांधण्याचा विषय मंजूर करण्यात आला. या कामासाठी एकूण ९९ लाख ९९ हजार ९७५ रुपये खर्चाची साजिद अली शहा यांची अंदाजपत्रकीय दराची निविदा मंजूर करण्यात आली.

तसेच मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत महिंदळे शिवारातील शीतल कॉलनी येथील खुल्या जागेवर ६० लाख २४ हजार ७० रुपये खर्चातून ग्रंथालय बांधण्याच्या कामासह मंजुरी देण्यात आली. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन यांच्या सर्वांत कमी शेकडा ०.१० टक्के कमी दराची निविदा प्राप्त होती, त्यामुळे त्यांना हे काम देण्यात आले.

चौक सुशोभीकरण

मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत पांझरा नदीकिनारी श्री सिद्धेश्‍वर गणपती मंदिर चौकाच्या सुशोभीकरण कामासाठी एकूण एक कोटी ३३ लाख ५० हजार ८०० रुपये खर्चास आर्थिक व प्रशासकीय तसेच तांत्रिक मान्यता होती. निविदा प्रक्रियेअंती शेकडा ८.९९ टक्के कमी दराने श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन यांची निविदा प्राप्त झाली.

एकूण एक कोटी तीन लाख २३ हजार ७५८ रुपये खर्चाची ही निविदा मंजूर करण्यात आली. याशिवाय मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत चार कोटी ९९ लाख ८९ हजार १९६ रुपये खर्चातून रस्ते, गटार, सभागृह, काँक्रिटीकरण आदी सात कामांनाही मंजुरी मिळाली. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन यांची यासाठी अंदाजपत्रकीय दराने निविदा प्राप्त होती, त्यामुळे त्यांना हे काम देण्यात आले.

Dhule Municipal Corporation
Dhule Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.