Dhule Crime News : शहराजवळील आमोदे (ता. शिरपूर) येथे दोन युवकांकडून तब्बल ११ तलवारी शहर पोलिसांच्या शोधपथकाने जप्त केल्या. (11 swords were recovered from 2 youths by search team of city police jalgaon crime news)
१३ एप्रिलला रात्री साडेनऊला ही कारवाई करण्यात आली. दोघेही संशयित अहिल्यापूर (ता. शिरपूर) येथील रहिवासी आहेत. त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने तलवारी जमविण्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना तलवारींबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसोबत शिरपूर फाट्यावर सापळा रचला. संशयित दुचाकी (एमएच १८, एयू ९५०२)ने आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रोहित राजेंद्र गिरासे (वय २४) व मनीष ओंकार गिरासे (१९) अशी संशयितांची नावे आहेत.
त्यांची झडती घेतल्यावर दुचाकीच्या उजव्या बाजूला सीटजवळ प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवलेली तलवार आढळली. त्यांनी आणखी किती तलवारी दडविल्या आहेत, अशी विचारणा करण्यात आली.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
संशयितांपैकी रोहित गिरासे याने तो कामाला असलेल्या बालाजी ऑटो पार्टस या गॅरेजमध्ये निकामी स्पेअरपार्टच्या आडोशाला प्लॅस्टिकच्या गोणीत दडविलेल्या दहा तलवारी काढून दिल्या.
संशयितांकडून तलवारी, दोन मोबाईल व दुचाकी असा एकूण एक लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप मुरकुटे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रवीण गोसावी, स्वप्नील बांगर, अमित रनमळे, भटू साळुंखे, मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी व राम भिल यांनी ही कामगिरी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.