Nandurbar News : वर्षभरात ऑनलाइन फसवणुकीचे 13 लाख 46 हजार मिळाले परत

Onilne Fraud
Onilne Fraudesakal
Updated on

नंदुरबार : ऑनलाइन बॅंकिंगमुळे आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात अनेकांना गंडा घालण्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. ज्यांनी तत्काळ सायबर सेलकडे तक्रार केली अशा काही जणांची रक्कम परत मिळविण्यात साबर सेलला यश आले आहे. १३ लाख ४६ हजार रुपये रिकव्हर करून फसवणूक झालेल्या नागरिकांना परत केले आहेत.

आजच्या आधुनिक युगात मोबाईल ही काळाची गरज बनलेली असून, बरेच आर्थिक व्यवहार मोबाईलद्वारे किंवा ऑनलाइन पद्धतीने केले जातात.

त्यामुळे वेळेची बचत होऊन वाचलेला वेळ चांगल्या कामासाठी वापरू शकतो, परंतु तोच मोबाईल काही वेळेस नागरिकांच्या अडचणी वाढविण्याचे कारण ठरू शकतो हे फसवणुकीच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. (13 lakh 46 thousand recovered from online fraud during year Performance of Nandurbar Cyber ​​Cell Nandurbar News)

Onilne Fraud
Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प

असाच प्रकार ५ जानेवारी २०२२ ला ऑनलाइन सायबर पोर्टलवरील नंदुरबार शहरातील तक्रारदार दिदीपक शिंदे यांना एनाडेस्क नावाचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगून मोबाईलचा ताबा घेतला.

त्यांच्या खात्यातून चार लाख २० हजार रुपये ऑनलाइन कपात करून त्यांची फसवणूक केली. त्यांनी तत्काळ सायबर सेलकडे संपर्क करून फसवणुकीबाबत माहिती दिली. तक्रारीवरून संबंधित वॉलेट/बँकेशी समन्वय साधून व वेळोवेळी पाठपुरावा करून फसवणूक झालेली रक्कम गोठवून ती परत तक्रारदारांच्या खात्यात परत मागविण्याची ईमेलद्वारे कारवाई केली.

त्यामुळे तक्रारदारांची एकूण चार लाख २० हजारांपैकी एक लाख ५० हजार रुपयांची रक्कम तत्काळ वाचविण्यात यश आले. दीड लाख लाभार्थ्यांचे बँक खात्यात गोठवून न्यायालयाच्या आदेशानुसार परत मिळणार आहेत. म्हणून तक्रारदार यांचे एकूण तीन लाख रुपये वाचविण्यात सायबर सेलच्या येथील पथकाला यश आले.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Onilne Fraud
Nashik News : टपाल पार्सल सेवेच्या सिस्टीममधून चीन Out! कोरोना प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा बंद

नवापूर येथील विकास शहा यांना १८ ऑक्टोबर २०२२ ला अज्ञात व्यक्तीचा फोन आला व त्याने तुमचे वीजबिल ११ रुपयांनी कमी भरलेले आहे, म्हणून ते भरण्यासाठी आम्ही तुमच्या मोबाईलवर पाठविलेली लिंक ओपन करा, असे सांगितल्याने तक्रारदारांनी ही लिंक त्यांच्या मोबाईलमध्ये ओपन केली असता त्यांच्या खात्यातून अचानक दोन लाख ९८ हजार रुपये ऑनलाइन कपात झाले.

त्यांना एसएमएसद्वारे समजले. त्यांनी लागलीच सायबर सेल, नंदुरबार येथे संपर्क साधून फसवणुकाबाबत तक्रार दाखल केली. पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी संबंधित वॉलेट/बँकेशी तत्काळ समन्वय साधून, पाठपुरावा करून फसवणूक झालेली रक्कम गोठवून ती परत खात्यात मागविण्याची ईमेलद्वारे कारवाई केली. त्यामुळे ती रक्कम परत मिळाली.

Onilne Fraud
Nashik News: मुख्यमंत्रीसाहेब सातबाऱ्यावर नोंदी पैशांशिवाय होतच नाही! जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस

सायबर पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये जिल्ह्यातील विविध प्रकारच्या फसवणूक

झालेल्या ३६ पेक्षा अधिक लोकांनी तत्काळ सायबर पोर्टल www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्यावर सायबर पोलिस ठाणे नंदुरबार येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय तत्परतेने संबंधित मोबाईल वॉलेट, बँक यांचे संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून व वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रारदार यांचे फसवणूक झालेले १३ लाख ४६ हजार ६४८ रुपये परत मिळवून दिले. तक्रारदारांनी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व पथकाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

Onilne Fraud
Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.