Dhule Crime News : ‘घरफोड्यां’ची हॅट्‍ट्रिक; ‘पोलिस’ क्लीन बोल्ड! 14 लाखांचे दागिने लंपास

Thieves looted money from the cupboard in Srinathnagar. Goods misplaced during theft.
Thieves looted money from the cupboard in Srinathnagar. Goods misplaced during theft. esakal
Updated on

Dhule Crime News : रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील पारोळा रोड भागात दरोडा टाकून १६ लाखांवर ऐवज लंपास, मंगळवारी भरदुपारी लक्ष्मीनगर येथे घरफोडी करत १५ तोळे सोने लंपास, त्यानंतर बुधवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास नकाणे रोड भागात पुन्हा घरफोडीतून १४ लाख रुपये किमतीचे २८ तोळे सोन्याचे दागिने लंपास... धाडसी चोरीच्या या ‘हॅटट्रिक’ने गेल्या तीन-चार दिवसांपासून धुळेकर नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत.

या घटनांनी पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. (14 lakh worth of jewels stolen in burglary dhule crime news)

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील नकाणे रोडवरील श्रीनाथनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे १४ लाखांचे २८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान, ही घरफोडी शाळकरी भावंडांच्या लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांनी चोरट्यांशी दोन हात केले. झटापटीत चोरट्याच्या हातून १५ तोळ्यांचे दागिने निसटले.

गुरुवारी (ता. २४) सकाळी एका मजुराला ते गवसले. त्याने प्रामाणिकपणे दागिने पोलिसांच्या हवाली केले. मात्र, त्यानंतरही चोरट्यांनी सुमारे सात लाख १९ हजारांचा ऐवज लंपास केला. शहराच्या देवपूर भागात निवृत्त मार्केटिंग अधिकारी कोमलसिंग भीमसिंग सिसोदिया (वय ६२, रा. प्लॉट ५३, श्रीनाथनगर, नकाणे रोड, धुळे) यांचे निवासस्थान आहे.

कानुबाई मातेच्या उत्सवानिमित्त खरेदीसाठी सिसोदिया कुटुंबीय घराला कुलूप लावून बुधवारी सायंकाळी बाजारात गेले. खरेदी झाल्यावर त्यांनी एका हॉटेलवर जेवणाचा बेत आखला. दरम्यानच्या काळात बंद घराची संधी साधत रात्री नऊदरम्यान दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांपैकी दोघांनी वॉल कंपाउंडवरून उडी मारत आत प्रवेश केला.

एक चोरटा बाहेर टेहळणीसाठी थांबला. उडी मारून घरात शिरणारे संशयित चोरटे असावेत, असा अंदाज जवळच असलेले किरण पाटील यांच्या खिडकीतून पाहणाऱ्या मुलीला आला. तिने घरात वडिलांना हा प्रकार सांगितला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Thieves looted money from the cupboard in Srinathnagar. Goods misplaced during theft.
Dhule Crime News : दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली; सोनगीर पोलिसांची कारवाई

श्री. पाटील यांनी त्यांचे बंधू जितेंद्र पाटील व निवृत्त पीएसआय विजय पाटील यांना घटेनची माहिती दिली. मोबाईलद्वारे आसपासच्या लोकांना बोलविण्यात दहा ते बारा मिनिटांचा कालावधी गेला. यादरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून २८ तोळे सोने व चार हजारांची रोकड चोरली.

चोरटे-नागरिकांत झटापट

ऐवज घेऊन चोरटे घराबाहेर येत असतानाच काही जण त्यांच्या दिशेने धावत आले. निवृत्त पोलिस विजय पाटील यांनी एकाला काठीने मारले. लोकांचा हल्ला होत असल्याचे पाहून एक चोरटा दुचाकीवरून पसार झाला. दुसरा विरुद्ध दिशेने पळाला, तर तिसऱ्याने नकाणे रोडच्या दिशेने पलायन केले.

दरम्यान, यश पाटील या दहावीत शिकणाऱ्या मुलाने एका चोरट्याला मागून पकडले, झटापटीत त्या चोरट्याचा शर्ट फाटला. त्यानंतर विजय पाटील यांनीदेखील चोरट्याला चोप दिला. चोरटा धावत सुटला. विजय पाटील त्याच्यामागे पळाले. दंडुका मारताना ते खाली पडले. दंडुका लागल्याने चोरटादेखील पडला. त्याला यशच्या बहिणीने काठीने झोडपले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.

Thieves looted money from the cupboard in Srinathnagar. Goods misplaced during theft.
Dhule Crime News : सॉ-मिलमध्ये थरार; साडेसोळा लाखांवर रोकड, दागिन्यांची लूट

दागिन्यांचा बॉक्स सापडला

जितेंद्र पाटील यांच्या घराचे काम श्री. सिसोदिया यांच्या घरापासून जवळच सुरू आहे. गुरुवारी सकाळी श्री. पाटील यांच्या बांधकामस्थळी ग्रॅनाइट कामासाठी संजय वर्मा (रा. सर्वेश्वरनगर, वाडीभोकर रोड, धुळे) व राजकुमार चौधरी (रा. रूपामाई शाळेजवळ, धुळे) दोघे आले.

काम करत असताना राजकुमार चौधरी यांना दागिन्यांचा बॉक्स सापडला. त्याने तो संजय वर्मा यांना दिला. बॉक्समध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने होते. त्यांनी ते जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हवाली केले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

सात लाख १९ हजारांचा ऐवज लंपास

तथापि, कोमलसिंग सिसोदिया यांनी पश्चिम देवपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (ता. २३) रात्री आठ ते साडेदहादरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील चार हजारांची रोकड, २५ ग्रॅम चांदीचे मेडल, पाच भार चांदीच्या साखळ्या, अडीच भार चांदीचे कडे, चार ग्रॅम सोन्याचे झुंबळ, १५ ग्रॅम सोन्याच्या चार अंगठ्या, सात तोळ्यांची सोन्याची मंगलपोत, सात ग्रॅम सोन्याचे टोंगल, अडीच तोळ्याच्या पाच सोन्याच्या अंगठ्या, चार तोळ्यांचा हार, ३६ ग्रॅम मंगलपोत, ३७ ग्रॅम सोन्याच्या दोन पाटल्या असा सुमारे सात लाख १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Thieves looted money from the cupboard in Srinathnagar. Goods misplaced during theft.
Dhule Crime News : लक्ष्मीनगरात 15 तोळे सोने लंपास; धुळेकर भयभीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.