Dhule: 150 वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवास उद्यापासून शिरपुरात सुरवात!

खालचे गाव व वरचे गावातील
रथोत्सव
खालचे गाव व वरचे गावातील रथोत्सवesakal
Updated on

शिरपूर : येथील दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या खालचे गाव व वरचे गावातील श्री बालाजी संस्थानच्या रथोत्सवाला गुरुवारी (ता.६) प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या रथोत्सवाची तयारी दोन्ही संस्थानातर्फे पूर्ण करण्यात आली आहे.

खालचे गावचा रथोत्सव
श्री प्रति तिरूपती बालाजी मंदिराच्या रथोत्सवाला १५३ वर्षांची परंपरा आहे. २६ सप्टेंबरपासून संस्थानच्या वहनोत्सवाला सुरवात झाली. संस्थानचा रथोत्सव सहा ऑक्टोबरला होणार आहे. सकाळी पावणेआठला दिवाणी न्या. रमेश भद्रे व तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते रथाची महापूजा केली जाणार आहे.(150 year old Rathotsava began in Shirpur from tomorrow dhule latest news)

आमदार अमरिशभाई पटेल अध्यक्षस्थानी असतील. सहदिवाणी न्या. पंकज जोशी, आमदार काशिराम पावरा, सहदिवाणी न्या. मयूर राणे, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, डीवायएसपी दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, मुख्याधिकारी तुषार नेरकर उपस्थित राहणार आहेत. संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, कार्याध्यक्ष प्रभाकर चव्हाण व विश्वस्तांनी संयोजन केले आहे.

वरचे गावचा रथोत्सव
१४७ वर्षांची परंपरा असलेल्या वरचे गाव येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचा रथोत्सव सात ऑक्टोबरला होणार आहे. सकाळी साडेनऊला मंदिर परिसरात बीड येथील आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या हस्ते रथपूजा केली जाणार आहे. आमदार अमरिशभाई पटेल अध्यक्षस्थानी असतील.

खालचे गाव व वरचे गावातील
रथोत्सव
Adimaya- Adishakti : रविवार पेठेतील रेणुकामाता

आमदार काशिराम पावरा, दिवाणी न्या. आर. आर. भद्रे, न्या.पंकज जोशी, न्या.मयूर राणे, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन, डीवायएसपी दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख उपस्थित राहणार आहेत. संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष झेंडूसिंह पाटील व सहकाऱ्यांनी संयोजन केले आहे.

खालचे गाव व वरचे गावातील
रथोत्सव
Nandurbar : मुलींनी दिला वडिलांना मुखाग्नी; स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.