Dhule Teacher Protest : राज्यातील दीड हजारावर विशेष शिक्षकांचे उपोषण; खानदेशातील शिक्षकही सहभागी

Mumbai: Special teacher involved in Azad Maidan movement.
Mumbai: Special teacher involved in Azad Maidan movement.esakal
Updated on

Dhule Teacher Protest : समग्र शिक्षा व समावेशित शिक्षणांतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत एक हजार ७७५ विशेष शिक्षकांनी २ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कायमस्वरूपी नियुक्तीसह प्रत्येक शाळेवर एका विशेष शिक्षकाच्या नियुक्तीसाठी हा लढा वजा सत्याग्रह सुरू केलाय. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकही सहभागी झाले आहेत.(1500 special teachers in state are on hunger strike dhule news)

मागील १७ वर्षांपासून अल्प मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. एक हजार ७७५ विशेष शिक्षकांमध्ये १५० च्या दरम्यान स्वतः दिव्यांगत्व/अपंग असलेले विशेष शिक्षक (अंध, अस्थिव्यंग)सुद्धा सहभागी झाले आहेत. या विशेष शिक्षकांची नियुक्ती जिल्हा निवड समितीमार्फत व बिंदुनामावलीनुसार झाली आहे.

वाड्या-वस्त्यांतील २१ प्रवर्गांतील (पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत) दिव्यांग बालकांचा शोध घेणे, त्यांना अंगणवाडी/शाळेत दाखल करणे, आवश्यकतेनुसार त्यांना सहाय्यभूत सेवेकरिता साहित्य साधनाकरिता वैद्यकीय सेवा/सर्जरीकरिता निश्चिती करणे, आवश्यकतेनुसार गृहभेट देऊन अध्ययन-अध्यापन करण्याचे संवेदनशील काम कार्यरत विशेष शिक्षक करीत आहेत.

सुमारे दोन लाख ४० हजार दिव्यांग बालके शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात शिक्षण घेत आहेत. विशेष शिक्षकांना कायमस्वरूपी नियमित तत्त्वावर या आदेशाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत शासन सेवेत नियमित तत्त्वावर नियुक्त्या करण्यासाठी पदनिर्मिती व पदभरतीबाबत निर्देशित केले आहे.

Mumbai: Special teacher involved in Azad Maidan movement.
Dhule Crime News : भाडेकरूने मागितली खंडणी; घरमालकाची आत्महत्या

न्यायालयाच्या आदेशानुसार दिव्यांग विद्यार्थी शिक्षकांचे निकष आणि मानके त्वरित अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही कार्यवाही झालेली नाही. दहा दिव्यांग बालकांकरिता एक विशेष शिक्षक आणि उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी १५ विद्यार्थ्यांमागे एक विशेष शिक्षक नियुक्त्या कराव्यात असे आदेशित केले आहे.

प्रमाणपत्रधारक प्रशिक्षित विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या कायमस्वरूपी नियमित तत्त्वावर करण्याबाबत राज्य शासनास आदेशित केले आहे. पण कार्यवाही झालेली नाही. शिक्षणव्यवस्थेकरिता विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या कायमस्वरूपी नियमित तत्त्वावर करण्यासाठी आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

''शासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटलेला नाही. आता बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही. आता मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाहीत.'' -राहुल पाटील, विशेष शिक्षक, धुळे

Mumbai: Special teacher involved in Azad Maidan movement.
Dhule Crime News : शेतातील मोटरचोर जेरबंद; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()