Dhule News : महामार्गांवर मृत्यू; दोनशेवर दुर्घटनांत 164 जणांचा गेला प्राण

Maharashtra road accidents highway
Maharashtra road accidents highwayesakal
Updated on

Dhule News : राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या पहिल्या सहा जिल्ह्यांत धुळे राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. ही चिंताजनक स्थिती आहे. जिल्ह्यात सरासरी २५ अपघातप्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट) आहेत. गेल्या तीन वर्षांत आतापर्यंत २१६ लहान-मोठे अपघात झाले आहेत.

त्यात १६४ जणांना प्राण गमवावा लागला आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घोषित केले आहे.( 164 people lost their lives in over two hundred accidents dhule news)

जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांत मुंबई-आग्रा क्रमांक तीन, सुरत-नागपूर क्रमांक सहा, धुळे-सोलापूर क्रमांक २११ तसेच बऱ्हाणपूर-अंकलेश्वर आदींचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे.

जलदगतीच्या दळणवळणासाठी चौपदरीकरणाची सुविधा एका दृष्टीने पूरक असली, तरी यातून ठिकठिकाणची अपघाती वळणे, वाहनचालकांची गती, गतिरोधकांच्या उंचीचा स्तर आणि उभारणी वाढत्या अपघातांना कारणीभूत असल्याचे अधोरेखित होते.

विविध उपाय सूचित

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रस्ते सुरक्षा आणि वाहतूक आढावा बैठक पार पडली. त्यानुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील सर्व महामार्गांवरील अतिक्रमण काढून रस्ते रुंदीकरण करणे, अपघातजन्य ठिकाणांवरील उपाययोजना, वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून अपघात रोखण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.

बारकाईने नोंद

वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघातांचे सखोल विश्लेषण करण्याची नवीन योजना आखली आहे. याअंतर्गत अपघाताचे ठिकाण, कारण, वेळ, वाहनाचा प्रकार, रस्त्याची अवस्था, हवामानाची परिस्थिती, वाहनचालक, प्रवाशांची माहिती यासह एकूण १७ विषयांची माहिती बारकाईने नोंदविली जात आहे.

Maharashtra road accidents highway
Dhule Accident News : डोक्यावरून गेले चाक; महिलेचा जागीच मृत्यू

आतापर्यंत झालेल्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात मुंबई-पुणे (चेन्नई) द्रुतगती महामार्गानंतर पंजाब ते कर्नाटक (धुळे ते सोलापूर) राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत, असे एनएचएआयने म्हटले आहे.

चुका आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जिल्ह्यात चौपदरीकरण झालेल्या व बेसुमार पद्धतीने टोलवसुली केल्यानंतरही महामार्गांवर ठिकठिकाणी धोकादायक खड्डे आहेत. दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. अनेक ठिकाणी पथदीप नाहीत. अवजड वाहने वाटेल त्या पद्धतीने महामार्गावर, सर्व्हिस रोडवर पार्किंग म्हणून लावली जातात.

महामार्गावर बेडरपणे उभी ठेवलेली किंवा नादुरुस्त अवजड वाहने उभी असल्यास ते मागून वेगाने येणाऱ्या वाहनधारकांना समजत नाही आणि अशा अपघातात निष्पापांचे बळी जातात. गावठी पद्धतीच्या गतिरोधकाचीही समस्या जटिल ठरत आहे.

असले गंभीर प्रकार, चुका दिसूनही महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांकडून कुठलीही ठोस कायदेशीर कारवाई होत नसल्याने अपघातांचे वाढते प्रमाण जबाबदार अधिकाऱ्यांना लक्षात घ्यावे लागणार आहे. यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होते.

Maharashtra road accidents highway
Dhule Accident News : आयशर उलटल्याने सोनगीरच्या डॉ. सोनवणेंचा अपघाती मृत्यू; सारेच हळहळले

सर्वाधिक मृत्यू, अपघाती जिल्हे

जिल्हा... मृत्यू... अपघात... ब्लॅक स्पॉट

* नाशिक... १७७... १९५... १५

* धुळे... १६४... २१६... २८

* नांदेड... १६०... २५३... ३४

* सातारा... १४४... १८२... २०

* छत्रपती संभाजीनगर... १३४... २२५... ३२

* नंदुरबार... १०७... १७५... ३०००

Maharashtra road accidents highway
Dhule Accident News : आयशर उलटल्याने सोनगीरच्या डॉ. सोनवणेंचा अपघाती मृत्यू; सारेच हळहळले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()