Nandurbar News : धडगाव तालुक्यातील सिंधीदिगरहून तोरणमाळकडे जाणारा १७ कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला असून, काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे या रस्त्याने वाहने जात नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
त्यामुळे तोरणमाळ परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. (17 crore road washed away in first rain Many villages lost contact Path of the road leading from sindhidigar to Toranmal Nandurbar News)
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ झापी लेकडा ते राज्य सीमा मार्गापर्यंत सिंधीदिगर करून तोरणमाळकडे जाणारा हा रस्ता १७ कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आला, मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची वाट लागली आहे.
ठेकेदार व संबंधित यंत्रणेने रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे व तयार करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ताकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा असा ः सातपुड्यातील अनेक रस्त्यांवर या वर्षी झालेल्या पहिल्याच पावसात दरड, चिखल-माती वाहून आली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर भूस्खलन झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, फलाई, सिंधीदिगर, तोरणमाळ, झापी, लेकडा ते राज्य सीमा मार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. १७ कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्त्याच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होत आहे.
ठिकठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट झाले असून, तत्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे. २४.५४ किलोमीटर लांबीचा या रस्ताकामासाठी २०१५ मध्ये १७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला होता.
मात्र रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. काही भागात डांबरीकरण केले, तर काही ठिकाणी काम अर्धवट सोडून आल्याचे दिसून येते. रस्त्यालगत खोल दरी असून, तेथे संरक्षण भिंती बांधण्याची आवश्यकता असतानादेखील भिंत बांधलेली नाही.
हा रस्ता तोरणमाळहून अति दुर्गम भागातून जात असून, पुढे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला जोडला जाणारा आहे या रस्त्या मार्गावर फलाई सिंधीदिगर, झापी, लेकडा, भाबरी, बादल, उडद्या, भमाना, सावऱ्यादिगर, बिलगाव, अनेक मोठी गावे जोडलेली आहेत; परंतु रस्त्याचे काम अर्धवट व निकृष्ट झालेले असल्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे अनेक गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला असून, वाहने जात नसल्याने नागरिकांना विविध हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यालगत येणाऱ्या झरकल नदीवरील पुलाचे काम अद्यापही झालेले नाही म्हणून फलाई, सिंधीदिगर, तोरणमाळ, झापी, लेकरा ते राज्य सीमा मार्गाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिले अदा करण्यात आल्याने चौकशी करण्याची मागणी हारसिंग नाईक, योगेश पावरा, रायसिंग नाईक, वीरसिंग नाईक, दुलसिंग नाईक, देवजी नाईक, प्रवीण पावरा, शिल्लदार पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थ निवेदनात म्हणतात...
-रस्त्याच्या दर्जाविषयी शंका.
-रस्ताकामाची चौकशी करावी.
-संरक्षण भिंतीची आवश्यकता.
-गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला.
-काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिले अदा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.