Dhule News : जिल्ह्यातून 2 कोटींचा दंड वसूल; गौणखनिज उत्खनन, वाहतूक साठ्याप्रकरणी महसुली कारवाई

sand
sand esakal
Updated on

Dhule News : जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक व साठवणुकीविरोधात महसूल विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येत आहे.

जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील अवैध गौणखजिन वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडून दोन कोटी तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.(2 crore fine recovered in case of minor mineral mining transport stock )

जिल्ह्यात नमूद कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक व साठवणूक करताना वाळूची १७१, मुरमाची ३४, मातीची पाच व दगडाची १२ अशी एकूण २२२ वाहने पकडण्यात आली आहेत. या पकडलेल्या वाहनमालकांकडून दोन कोटी तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दंड न भरलेल्या एकूण सात वाहनांचा तहसील कार्यालयामार्फत लिलाव करून त्यातून दंडाची रक्कम सात लाख चार हजार ७५० वसूल करून ती शासनजमा करण्यात आली आहे. तसेच अवैध गौणखनिज वाहतूक करीत असताना पकडलेल्या वाहनमालकांनी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली असता वाहनमालकाच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे.

चोवीस तासांची पथके

अवैध गौणखनिज वाहतूक करत असताना पकडलेली वाहने अवैधरीत्या पळवून नेल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा वाहनचालक, वाहनधारकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

sand
Dhule News : नवरात्रोत्सवापूर्वी पथदीप सुरू न झाल्यास आंदोलन; धुळे शहरातील 40 टक्के पथदीप बंद

अवैध गौणखनिजाची वाहतूक प्रभावीपणे थांबविण्याकामी जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयांतर्गत २४ तास पथके कार्यरत असून, जिल्ह्याच्या मुख्यालयीदेखील जिल्हास्तरीय भरारी पथक कार्यान्वित केले आहे. जिल्ह्यात अवैध गौणखनिज वाहतूक रोखण्याकामी नेमलेल्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चार वेळा जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती श्री. गोयल यांनी दिली.

एमपीडीएची कारवाई

या स्थितीत महसुली अधिकारी व कर्मचारी काम उत्तमरीत्या करीत असून, अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई सुरू आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यामार्फतदेखील अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.

अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या सराईत गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्यांतर्गत कार्यवाही होत आहे. यापुढेही अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच नवीन वाळू धोरण २०२३ अंतर्गत जिल्ह्यात शासकीय वाळू डेपो निर्माण करण्याची कारवाई सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.

sand
Dhule News : उच्चदाब वीजवाहिनी अभावी अतिदक्षता विभाग ओसाडच; धुळे ‘सिव्हिल’ची स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()