Nandurbar Accident News : नवापाडा येथील दोघांचा अपघातात मृत्यू

Nandurbar Accident News
Nandurbar Accident Newsesakal
Updated on

Nandurbar News : नवापूरनजीक सावरटजवळील धुळे-सुरत महामार्गाच्या उड्डाणपुलावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील एकजण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला होता. (2 died in an accident Nandurbar Accident News)

गंभीर जखमीला सोनगड (गुजरात) येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचे निधन झाले. नवापाडा (ता. नवापूर) गावातील दोन जणांचा अपघातात मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांसह गावावर शोककळा पसरली. अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.

नवापाडा (ता. नवापूर) येथील दोन मित्र मुलीकडे मोटारसायकलीने जात असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना सावरट गावाजवळ धुळ्याहून गुजरातकडे जाणारी कार (जीजे ०१, आरवाय ०८७५) व मोटारसायकल (जीजे ५, केएल १९९९) अचानक समोर आल्याने कारचालकाने जोरदार ब्रेक मारला.

कार व दुचाकीची जबर धडक झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी असताना त्यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातात नंदऱ्या होमा गावित (वय ६०, रा. नवापाडा) यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Nandurbar Accident News
Nandurbar Accident News : लोणखेडा येथे Tractor-Indica चा अपघात; दोघे जखमी

वेच्या महाऱ्या गावित (वय ५८, रा. नवापाडा, ता. नवापूर) गंभीर जखमी झाले होते. त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी गुजरातकडे घेऊन जाताना सोनगड (गुजरात) गावाजवळ रस्त्यातच त्यांचे निधन झाले.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज परदेशी, हवालदार दिनेश वसुले तपास करीत आहेत. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नवापाडा ग्रामस्थांनी गर्दी केली होती. फॉर्च्यूनर कंपनीचे चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Nandurbar Accident News
Jalgaon Accident News : दुचाकीवरून घसरून मुलाचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.