Dhule News: चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकारी, पण एकही थांबेना! 25 हजार लोकसंख्या वाऱ्यावर

चिमठाणे (ता. शिंदखेडा) प्राथमिक आरोग्य केंद्र सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्ग एक व शिंदखेडा-साक्री राज्य मार्ग १२ ला लागून असल्याने अपघातांचे प्रमाण जास्त आहे.
Primary Health Center Building
Primary Health Center Buildingesakal
Updated on

चिमठाणे : चिमठाणे (ता. शिंदखेडा) प्राथमिक आरोग्य केंद्र सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्ग एक व शिंदखेचिमठाणे (ता. शिंदखेडा) प्राथमिक आरोग्य केंद्र सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्ग एक व शिंदखेडा-साक्री राज्य मार्ग १२ ला लागून असल्याने अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

डा-साक्री राज्य मार्ग १२ ला लागून असल्याने अपघातांचे प्रमाण जास्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

दोघांपैकी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत ओपीडीसाठी थांबतात. एकनंतर मुख्यालयात राहत नसल्याने दुपारी एकनंतर अपघातातील जखमी किंवा २५ गावांतील रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड व गैरसोय होत आहे. (2 Medical Officer at Chimthane Primary Health Centre but non stop 25 thousand population on wind Dhule News)

चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत आहे. वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जगदीश जगदाळे व डॉ. अक्षय मराठे कार्यरत आहेत. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात थांबणे गरजेचे आहे.

मात्र दोघे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपसातील ‘तडजोडी’नुसार एक वैद्यकीय अधिकारी सकाळी दहाला येतात व ओपीडी काढल्यानंतर एकपर्यंत थांबतात व मुख्यालय सोडून निघून जातात.

वैद्यकीय अधिकारी ऐकेनात!

प्राथमिक आरोग्य केंद्र चौफुलीवर असल्याने अपघातांचे प्रमाण जास्त आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश जगदाळे दोंडाईचा येथून अपडाउन करतात, तर डॉ. अक्षय मराठे शिंदखेडा येथून अपडाउन करतात.

गुरुवारी (ता. १) दुपारी चारच्या सुमारास चिमठाणेजवळ मोटारसायकल अपघात झाला. त्यात भगवान सखाराम भिल (वय ५०) व जितू भिल (वय ३५, दोघी रा. धावडे, ता. शिंदखेडा) यांना गंभीर दुखापत झाली होती.

Primary Health Center Building
Dhule News : शिरूडच्या कालिकादेवी मंदिरासाठी 11 कोटी 60 लाख!

मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

चिमठाणे येथील संजय कृष्णा वाणी (वय ४०) याला चिमठाणे चौफुलीजवळ मोटारसायकलने ३० जानेवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास धडक दिल्याने जखमी झाला होता. वैद्यकीय अधिकारी नसल्याने धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

"चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सकाळी दहाला येतात व दुपारी लवकर निघून जातात. ते मुख्यालयाला राहत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र चौफुलीवर असल्याने नेहमी अपघातात होतात. मात्र जखमींना प्राथमिक उपचार मिळत नाहीत. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीत हा विषय मांडणार आहे."

-महेंद्रसिंह गिरासे, जिल्हा परिषद सदस्य तथा सदस्य, आरोग्य समिती, जिल्हा परिषद धुळे

Primary Health Center Building
Dhule HSC SSC Exam: दहावी-बारावीचे 52 हजारांवर विद्यार्थी देणार परीक्षा! 5 भरारी पथकांची नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()