Dhule Fraud Crime : शहरात ब्रॅन्डेड कंपनीच्या नावाने बनावट घडाळ्यांची होणारी विक्री एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणली. यात दोन दुकानांवर छापा टाकत १८२ घड्याळींसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच दोन दुकानदारांना अटकही करण्यात आली.(2 shopkeeper arrested for selling fake watches in branded name dhule crime news)
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मेट्रो वॉच कंपनी व जे. बी. रोडवरील वर्षा वॉच कंपनी या दुकानांमध्ये नामांकित कंपनीच्या बनावट घड्याळ्यांची नक्कल करून विक्रीद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना बुधवारी (ता. २०) मिळाली.
त्यानुसार त्यांनी एसएनजी सॉलिसिटर एलएलपी कंपनी लिमिटेडचे प्रतिनिधी गौरवश्याम नारायण तिवारी, सुजीत सुरेश खंडाळे यांच्यासह पथक तयार केले. या पथकाने ही कारवाई केली.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, श्याम निकम, संतोष हिरे, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, जितेंद्र वाघ, हर्शल चौधरी, योगेश साळवे, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
९६ हजाराचा मुद्देमाल
पथकाने मधुर शॉपी कॉम्प्लेक्समधील मेट्रो वॉच कंपनी दुकानावर छापा टाकला. दुकान मालकाने सुनील किशोर बजाज (रा. ब्लॉक क्रमांक ओ/८, कुमारनगर, साक्री रोड, धुळे) असे नाव सांगितले. दुकानातील साहित्याची तपासणी केली असता त्यात बनावट घड्याळी व साहित्य मिळून आले.
यात ८० हजारांच्या फास्टट्रॅक कंपनीचे लोगो असलेल्या एकूण १६० घड्याळी, १६ हजारांचे फास्टट्रॅक नाव असलेले घड्याळींचे एकूण ३२० डायल, असा सुमारे ९६ हजारांचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकाने जप्त केला.
दुसरी कारवाई
पहिल्या कारवाईनंतर पथकाने शहरातील जे. बी. रोडवरील वर्षा वॉच कंपनी या दुकानावर कारवाई केली. अशोक पोकरदार कटारिया (रा. २१ झुलेलाल सोसायटी, साक्री रोड, धुळे) असे दुकानमालकाने नाव सांगितले.
या दुकानातील तपासणीत ११ हजारांचे फास्टट्रॅक कंपनीचे नाव व लोगो असलेल्या एकूण २२ घड्याळी, घड्याळींचे ४० डायल, टायटन नाव असलेले घड्याळींचे ११ डायलकेस, बेल्ट लॉक, असे एकूण १५ हजार ९५० रुपयांचे साहित्य जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.