Nandurbar News : कोळदा (ता. नंदुरबार) शिवारातील महिलेच्या खुनाचा तपास अवघ्या दोन दिवसांत लावून स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.
पोलिसांना १ मेस सकाळी अकराला कोळदा शिवारातील नरोत्तम पाटील यांच्या बाजरीच्या पिकात ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याचे कळले. (2 who brutally murdered woman were arrested by police Nandurbar Crime News)
जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व अंमलदारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली असता, साडी व ब्लाउज परिधान केलेली अनोळखी महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत
जमिनीवर पडलेली होती. मृत महिलेच्या गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून ठार करून बाजरीच्या शेतात फेकून दिले होते. महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून तत्काळ नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व नंदुरबार तालुका पोलिस निरीक्षक राहुल पवार यांच्याशी चर्चा करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
पोलिस अधीक्षक पाटील यांना बातमी मिळाली, की कोळदा येथील महिलेचा खून त्याच गावातील बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल अशांनी मिळून केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खेडकर यांना ती माहिती दिली. पथकाने गुन्ह्यातील संशयित बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
बोलते करून दोन्ही आरोपींना गुन्ह्याबाबत कबुली दिली. बन्या सन्या पाडवी (वय ५५, रा. कोळदा, ता.जि. नंदुरबार, परान ऊर्फ प्रवीण ऊर्फ पिंट्या धडू भिल (वय ४०, रा. कोरीट, ता.जि. नंदुरबार) यांना ताब्यात घेण्यात आले. खुनासारखा गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघड करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले.
छायाचित्रावरून ओळख पटली
मृताचे व हातावर गोंदलेले छायाचित्र समाज माध्यमावरदेखील प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर १ मेस दुपारी तीनच्या सुमारास पोलिस अधीक्षक पाटील यांना ती महिला कोळदा येथील आहे, परंतु बरीच वर्षे झाली ती कोळदा गावी आलेली नाही म्हणून मृत महिला निश्चित तीच असेल असे नाही, अशी त्रोटक माहिती मिळाली.
पथकाने तत्काळ कोळदा येथे जाऊन मृत महिलेच्या वडिलांची भेट घेतली व त्यांच्याकडे विचारपूस केली. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पथकाने मृताच्या वडिलांना मृताच्या हातावर गोंदलेले छायाचित्र दाखविले असता त्यांनी ती त्यांचीच मुलगी असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.