Dhule Municipality News : प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर महागात; बेकरी विक्रेत्यांना 20 हजार दंड

महापालिकेला पुन्हा एकदा प्लॅस्टिक बंदी कायद्याची आठवण आली.
A municipal team collecting fines from bakery shopkeepers on Sakri Road along with confiscation of plastic bags
A municipal team collecting fines from bakery shopkeepers on Sakri Road along with confiscation of plastic bagsesakal
Updated on

Dhule News : महापालिकेला पुन्हा एकदा प्लॅस्टिक बंदी कायद्याची आठवण आली. पथकाने शहरातील साक्री रोडवरील चार बेकरी दुकानदारांवर कारवाई करत २० हजार रुपये दंड वसूल केला, तसेच सुमारे एक टन प्लॅस्टिक पिशव्याही त्यांच्याकडून जप्त केल्या.

महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी आहे. (20 thousand fine for plastic ban bakery dealers dhule municipality news)

यात विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या व इतर वस्तूंना बंदी घातली आहे. मात्र, या वस्तूंची सर्रास विक्री, वापर दिसून येतो. धुळे महापालिकेकडून अनेकदा याबाबत कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

मात्र, एक-दोन दिवस कारवाई झाल्यानंतर पुन्हा या समस्येकडे कुणी लक्ष देत नाही. अशा बंदी घातलेल्या वस्तूंची विक्री, साठवणूक अथवा वापर करू नका, असे आवाहन महापालिकेकडून केले जाते.

मात्र, त्याला कुणी घाबरत नाही. त्यामुळे पुन्हा या वस्तूंचा वापर सुरू होतो. दरम्यान, बुधवारी (ता. १७) महापालिकेच्या पथकाला पुन्हा कारवाईबाबत जाग आली.

त्यातून पथकाने शहरातील साक्री रोडवरील बेकरी दुकानदारांकडे कारवाई केली. यात बाबा बेकरी, दीपक बेकरी, रमेश बेकरी व भाग्यश्रील बेकरी या दुकानांमध्ये प्लॅस्टिक कॅरिबॅगा आढळून आल्या.

A municipal team collecting fines from bakery shopkeepers on Sakri Road along with confiscation of plastic bags
Dhule Municipality News : धुळ्यात नायलॉन मांजा आढळल्यास कारवाई; मनपा आयुक्तांचा इशारा

त्यामुळे या चारही दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. पथकाने चारही दुकानदारांकडून एकूण २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

या दुकानांमधून सुमारे एक टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. धुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या निर्देशानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे.

स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, विकास साळवे, चेतन अहिरे, महेंद्र ठाकरे, संदीप मोरे, गजानन चौधरी, साईनाथ वाघ, रतन निरगुडे, शुभम केदार, एजाज शेख, आसिफ बेग, मनीष आघाव.

गौरव माळी, प्रमोद चव्हाण, अख्तर शेख, संदीप वाघ, मुकादम जय किशन पिवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

A municipal team collecting fines from bakery shopkeepers on Sakri Road along with confiscation of plastic bags
Dhule Municipality News : अवैध नळजोडणी केल्यास गुन्हे दाखल करणार; नागरिकांसह कारागिरांना धुळे मनपाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.