धुळे : जिल्ह्यातील राष्ट्रीय (National) लोकअदालतीत वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण ३५ हजार ५४४ प्रकरणांचा निपटारा झाला. (22 crores 10 lakhs 3 thousands have been compensated recovered In National People's Court dhule news)
यात २२ कोटी १० लाख तीन हजारांची नुकसानभरपाई व वसुली झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली.
दिल्लीस्थित राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने जिल्ह्यात येथील जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत झाली. तीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली. न्यायालयातील प्रलंबित सात हजार ९७९ प्रकरणे होती.
ज्यात धनादेश न वठल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे होती. त्याचप्रमाणे वादपूर्व प्रकरणे होती. ज्यात ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टीची प्रकरणे, थकीत वीजबिले, बॅंकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे होती.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
संबंधित प्रकरणांमध्ये प्रलंबित ५५२ व दाखलपूर्व ३४ हजार ९९२ प्रकरणे, अशी एकूण ३५ हजार ५४४ सामोपचाराने निकाली निघाली. लोकअदालतीमध्ये २२ कोटी १० लाख तीन हजार रुपयांची नुकसानभरपाई व वसुली झाली.
लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
खटल्यात समझोता घडवून आणण्यासाठी पक्षकारांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्हा वकील संघ, तालुका वकील संघ, पक्षकार, पोलिस, सर्व बँका, सर्व ग्रामपंचायत, महावितरण कंपनी आदींनी सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. ए. डी. क्षीरसागर व सचिव न्या. संदीप स्वामी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.