Dhule News : परस्परविरोधी तक्रारींवरून 2 गटांमधील 22 जणांवर गुन्हा

Crime News
Crime Newsesakal
Updated on

धुळे : शहरातील जुने धुळे परिसरात बुधवारी (ता. २२) मध्यरात्री दोन गटांत हाणामारी झाली. त्यात चाकू, बेसबॉलचा दांडा, हॉकीस्टिक, लोखंडी दांडा, काठ्यांचा सर्रास वापर झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले. (22 persons from two groups booked on conflicting complaints in clash in Old Dhule Dhule News)

तसेच एका घरावर दगडफेक करीत वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून संशयित २२ जणांवर गुन्हा दाखल झाला.आझादनगर पोलिस ठाण्यात कुंदन रवींद्र शिंदे (रा. सूर्यमुखी मंदिराजवळ, वरखेडी रोड, जुने धुळे) याने दिलेल्या तक्रारीनुसार तो बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वरखेडी रोडने पायी घरी जात होता.

श्री भोलेबाबा मंदिराजवळ रिंकू बडगुजर, मल्या बडगुजर, सागर शिंदे, दीपक पाटोळे, भूषण माळी व हर्शल महाचार्य यांनी कुंदनला दुचाकीवर येऊन अडविले. आकाश परदेशी याच्यासोबत राहतो, याचा राग येऊन त्यांनी कुंदनला शिवीगाळ केली. मल्या बडगुजर याने चाकूसदृश वस्तूने खांद्यावर वार करीत जखमी केले

तसेच इतरांनी लाकडी दांडक्याने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान कुंदनची त्याचे मित्र दर्शन माळी, निखिल बडगुजर यांनी सोडवासोडव केली. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी संशयित सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Crime News
Dhule News| संशयितांची गय करणार नाही : किशोर काळे

परस्परविरोधी तक्रार

परस्परविरोधी तक्रारीत प्रतीक ऊर्फ मल्ला प्रकाश बडगुजर (रा. वरखेडी रोड, जुने धुळे) याने म्हटले आहे, की आकाश गणेश परदेशी, निखिल बडगुजर, दिगंबर माळी यांनी बेसबॉलच्या दांड्याने बेदम मारहाण केली, तर सागर परदेशी, दर्शन चौधरी, दर्शन माळी, प्रथमेश काळे, नटू परदेशी, शिवम परदेशी व इतर सात ते आठ जणांनी लोखंडी रॉड, हॉकीस्टिक, कोयत्याने

घराबाहेर उभ्या दोन कारच्या काचा व पत्रे आणि तीन दुचाकींच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच दगड फेकून दरवाजाच्या काचा फोडल्या. शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित १६ ते १७ जणांवर गुन्हा दाखल झाला.

Crime News
Vegetable Rates Fall : पालेभाज्यांचे भाव गडगडले; कोथिंबीर फक्त एक रुपया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.