Nandurbar News : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील रस्ते चकाकणार; 24 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर

Chandrakant Raghuvanshi
Chandrakant Raghuvanshiesakal
Updated on

Nandurbar News : तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांसाठी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून शासनाने २४ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाहनांचा वाढता भार लक्षात घेता दुरुस्ती, मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी निधीचा उपयोग केला जाणार असून, ग्रामीण भागातील रस्ते आता चकाचक होणार आहेत.(24 Crores 20 Lakhs sanctioned for roads in eastern part of Nandurbar taluka nandurbar news)

नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या अस्तित्वाची झुंज सुरू आहे. रस्त्यांनी पायी जाणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदनाद्वारे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

महायुती शासनाने मागणीची दखल घेत २४ कोटी २० लाख रुपयांच्या निधी मंजूर केला. त्यात बिगरआदिवासी क्षेत्रातील गावांसाठी १९ कोटी ६० लाख, तर आदिवासी क्षेत्रातील गावांसाठी चार कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

या निधीच्या माध्यमातून नंदुरबार तालुक्याचा पूर्व पट्ट्यातील गावांचे रस्ते तयार होऊन ते आता लवकरच चकाचक होतील, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांना आहे. निधी मंजूर झाला खरा मात्र तो लवकरात लवकर उपलब्ध होऊन रस्त्यांचा कामाला प्रारंभ होणे अपेक्षित आहे. त्यासाठी माजी आमदार रघुवंशी यांना पाठपुरावा करून निधी पदरात पाडून घ्यावा लागणार आहे.

Chandrakant Raghuvanshi
Nandurbar News : तळोद्यातील बायपास रस्त्याला प्रशासकीय मान्यता; 27 कोटी 17 लाखांचा निधी मंजूर

नेत्यांचे व्यक्त केले आभार

नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मागणी केल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधीस मंजुरी देऊन नंदुरबारकरांना न्याय दिला आहे. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील जनतेतर्फे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत यांनी नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

या रस्त्यांचा समावेश

कोपर्ली ते कंढ्रे रस्त्यासाठी ६० लाख, बह्याने ते आराळे रत्यासाठी ४० लाख, कोपर्ली ते शेल्टी रस्त्यासाठी एक कोटी, कार्ली ते कांड्रे रस्त्यासाठी लाख ४० लाख, जुनमोहिदा ते तिसी स्टेशन ८० लाख, न्याहली, बलदाणे, भादवड-सतुरखे रस्ता एक कोटी, इजिमा ५४ ते मालपूर रस्ता ७५ लाख, तलवाडे ते नंदुरबार तालुका हद्दीस मिळणारा रस्ता ७५ लाख, होळ ते तिसी स्टेशन रस्ता ७५ लाख.

आसाणे ते ठेलारपाडा रस्ता ५० लाख, नंदुरबार तालुक्यातील प्रजिमा- १७ ते सैताने रस्ता २५ लाख, घोताणे ते आसाने रस्ता ३० लाख, तलवाडे बुद्रुक ते प्रजिमा- ५४ ला मिळणारा रस्ता ५० लाख, रनाळे ते रजाळे रस्ता ५० लाख, रनाळे ते धंडाणे एक कोटी रस्ता, रनाळे ते धंडाणे रस्त्यावर चार स्लेबड्रेन बांधणे ९० लाख. यासह अन्य रस्ते कामांचा समावेश आहे.

Chandrakant Raghuvanshi
Nandurbar News : शहादा, तळोद्यासाठी 119 कोटींचा निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.