Dhule News : 3 महिन्यात जिल्ह्यातील 244 बेपत्ता; विविध पोलिस ठाण्यात नोंद

missing
missingesakal
Updated on

Dhule News : मागील तीन महिन्यातच जिल्ह्यात तब्बल २४४ जण हरविल्याची अर्थात बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत झाली. विशेष म्हणजे यात तब्बल ९८ मुली व महिलांचा समावेश आहे. याशिवाय विविध कारणांनी २८३ जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचेही या नोंदीतून आढळते. (244 missing in district in 3 months Recorded in various police stations Dhule News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

missing
Crime news : गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक

धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या नोंदी होतात. विविध गंभीर गुन्ह्यांसह विविध कारणांनी होणारे मृत्यू, तसेच मिसिंगच्या तक्रारीही दाखल होतात. यात नवीन वर्षात अर्थात १ जानेवारी ते ५ एप्रिल या तीन महिन्यातील एकूण १७ पोलिस ठाण्यातील नोंदीवर नजर टाकल्यास या तीन महिन्यांत २४४ जण हरविल्याची नोंद झाली आहे.

त्यापैकी २० जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. दोन पुरुष, एक महिला, चार मुले, आठ मुली आदींचा यात समावेश आहे. मात्र, ९८ महिला, ७७ मुली, ६८ पुरुष व ३३ मुले अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

तसेच, या तीन महिन्यांतच २८३ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. त्यांची पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. या २४४ पैकी २६६ जणांचे वारसदार आढळून आले तर १७ जण बेवारस असल्याची नोंद झाली.

missing
Crime news : पाळण्यासाठी घेऊन गेलेल्या गाईंची परस्पर विक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()