Dhule Crime News : शहरात विनापरवाना गुंगीकारक औषधाची चोरटी विक्री करणाऱ्या तरुणाला आझादनगर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.
त्याच्याकडून ३८ हजार रुपये किमतीच्या २५० औषधी बॉटल्स जप्त करण्यात आल्या. (250 bottles of anesthetic drugs seized by police dhule crime news)
या कारवाईबाबत पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
फारुक ऊर्फ बबल्या अहमद अनिस अहमद (वय-२२, रा. शहिद अब्दुल हमीद नगर, धुळे) असे संशयिताचे नाव आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २७ एप्रिलला रात्री नऊच्या सुमारास त्याच्या घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता बेडरुममध्ये एकूण तीन खोक्यामध्ये १०० मिलीच्या एकूण २५० औषधी बॉटल मिळून आल्या.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
त्यांची किंमत ३८ हजार ५०० रुपये आहे. संशयित तरुणाकडे औषधसाठा खरेदी केल्याचे बिल तसेच विक्री करण्याचा कोणताही परवाना अगर वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान अथवा पदवी नसताना अथवा कोणत्याही डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शनशिवाय रंगेहाथ मिळून आला. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहा पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, त्यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाठ, प्रकाश माळी, आरीफ सय्यद, खालीदा सय्यद, राजू देसले, संदीप कढरे, अतिक शेख, शोएब बेग, योगेश शिंदे, सुशील शेंडे, अजहर शेख, सिद्धान्त मोरे, संतोष घुगे, चालक प्रमोद खैरनार, हरिश गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.