Dhule Crime News : 3 लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त; ‘एलसीबी’ कडून संशयित ताब्यात

शहरातून होणारी तीन लाखांच्या बनावट मद्याची वाहतूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने उधळली.
Liquor stock seized from smuggled traffic.
Liquor stock seized from smuggled traffic.esakal
Updated on

Dhule Crime News : शहरातून होणारी तीन लाखांच्या बनावट मद्याची वाहतूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने उधळली.

या प्रकरणी मोगलाईतील एका संशयिताला ताब्यात घेतले. तसेच साक्रीच्या दोघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (3 lakh fake liquor seized Suspect detained by LCB Dhule Crime News)

शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या जामचा मळा येथे हॉटेल बागे-सकुनशेजारी एका मोटार गॅरेजसमोर छोटा हत्ती (एमएच १५, डीके २०२७) वाहन उभे आहे. वाहनाच्या तळाशी पत्रा लावून बॉक्स आहे. त्यात बनावट मद्याच्या बाटल्या भरल्याची माहिती ‘एलसीबी’चे दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली. त्यांनी पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथक घटनास्थळी पोचले.

वाहनाजवळून संशयित चंद्रप्रकाश गहिंदल पाटील (रा. पद्मनाभनगर, साक्री रोड, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नारायण माळी (रा. शिरपूर), श्रीराम बाबर आणि महेंद्र शिवाजी चौधरी (दोघे रा. साक्री) बनावट देशी मद्य बनवतात, त्यांच्या सांगण्यावरून हे मद्य वाहनात भरून नियोजित ठिकाणी पोच करीत असल्याचे कबूल केले.

Liquor stock seized from smuggled traffic.
Crime: १८ वर्ष चालला खटला अन् झाली २ वर्षांची शिक्षा

तपासणीत वाहनाच्या पृष्ठभागाखाली पत्र्यात एक बॉक्स दिसला. बॉक्समध्ये ७४ हजार २०० रुपयांच्या एक हजार ६० बाटल्या, २३ हजार २४० रुपयांच्या ३३२ बाटल्या आढळल्या. पोलिसांनी दोन लाखांचे वाहन, पाच हजारांच्या मोबाईलसह तीन लाख दोन हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, गणेश फड, संजय पाटील, श्याम निकम, मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, प्रकाश सोनार, संतोष हिरे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, प्रशांत चौधरी आदींनी ही कारवाई केली.

Liquor stock seized from smuggled traffic.
Dhule Fraud Crime : शासनाची 75 लाखांत फसवणूक; रुणमळीच्या निलंबित ग्रामसेवकासह तिघांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.