Dhule News : एका झटक्यात 31 कोटी 73 लाखांची कामे स्थायी समितीत मंजूर

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : महापालिका हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत तब्बल ३१ कोटी ७३ लाख रुपयांवर खर्चाच्या कामांना गुरुवारी (ता. १४) महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात विविध प्रभागातील ३९ कामांचा समावेश आहे.

याशिवाय सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, रस्ते व क्रॉस ड्रेनेजची दुरुस्ती व आनुषंगिक कामांच्या विषयालाही स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. (31 crore 73 lakh works approved in standing committee dhule news)

सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. मनपा हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत कामांसाठी आलेल्या निविदादरांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे विषय होते.

स्लॅब ड्रेन, रस्ता काँक्रिटीकरण, जॉगिंग ट्रॅक, रस्ता डांबरीकरण, संरक्षक भिंत, स्ट्रीटलाइट, पूल बांधणे, महिंदळे शिवारात स्मशानभूमी, महिंदळे येथे दहा सीटचे शौचालय, कुमारनगर अमरधाम दशक्रिया विधी शेड व बैठक व्यवस्था करणे, रस्ता खडीकरण, डांबरीकरण, भूमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरण, पाइपलाइन आदी कामांचा यात समावेश आहे. अशा ३९ कामांसाठी प्राप्त निविदांपैकी सर्वांत कमी निविदाधारकांना कामे देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.

शंभर टक्के अनुदान

मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत ३९ कामांसाठी एकूण ३१ कोटी ७३ लाख ३८ हजार ३११ रुपये खर्च होणार आहे. यातील २३ कामांचा खर्च हा जीएसटी वगळून असल्याने या खर्चात पुन्हा वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे शासनाच्या १०० टक्के अनुदानातून होणार आहेत. यात महापालिकेचा हिस्सा नसल्याचेही बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

खड्डे बुजविण्यासह मान्यता

गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव आदी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासदेखील स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule News : धुळे जिल्ह्यात 17 पासून ‘आयुष्मान भव’ पंधरवडा

यापूर्वी खड्डे बुजविण्याचा विषय स्थायी समितीने दोनदा फेटाळून लावला होता. दरम्यान, ज्या रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत, असे रस्ते वगळून किंवा अशा रस्त्यांवर आजच खड्डे बुजविणे गरजेचे असल्यास ते तात्पुरत्या स्वरूपात बुजवून इतर ठिकाणच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यात येणार आहेत.

यात १०० फुटी रस्ता मालेगाव रोड ते ४० गाव रोड ते वडजाई रोड ते बायपास हायवेपर्यंत, ८० फुटी रोड रेल्वे स्टेशन रस्ता ते अग्रसेन पुतळा ते डॉ. खोपडे हॉस्पिटल ते वडजाई रोड ते ८० फुटी रोड, डॉ. जे. के. ठाकरे ते खोपडे यांच्या मंगल कार्यालयापर्यंत, गल्ली नंबर १ ते ७ मुख्य बाजारपेठेमधील जोडरस्ते, देवपूर भागातील मुख्य रस्ते आदी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.

कामांची संख्या अंदाजपत्रकीय रक्कम ठेकेदार

-चार कामे...४,१८,८३,९४८...............गायत्री कन्स्ट्रक्शन (अंदाजपत्रकीय दर)

-पाच कामे..४,१८,७१,८६४.............. मे. ए. बी. वाघ (०.५६ टक्के कमी दर)

-सात कामे...३,६०,८१,९४८...श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन (अंदाजपत्रकीय दर)

-चार कामे...३,४२,३३,५८६..............मे. ए. बी. वाघ (०.५६ टक्के कमी दर)

-तीन कामे...२,४१,९०,०८५............. आदर्श कन्स्ट्रक्शन (अंदाजपत्रकीय दर)

-सोळा कामे...१३,९०,७६,८८०.......मे. पी. पी. डेव्हलपर्स (अंदाजपत्रकीय दर)

-खड्डे बुजविण्याचे काम....................गायत्री कन्स्ट्रक्शन (अंदाजपत्रकीय दर)

Dhule Municipal Corporation
Dhule News : शिंदखेडा रेल्वेस्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळेल का? रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडून अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()