Sati Ahilyadevi Yatrotsav : बोरीस यात्रेत 35 हजार भाविक सती अहिल्यादेवीच्या चरणी

बोरीस (ता. धुळे) येथील सती अहिल्यादेवीची यात्रा शुक्रवार (ता. ९)पासून सुरू झाली.
The crowd gathered to see Sati Ahilya Devi. In the second picture, Nikhil Deore is joining for wrestling.
The crowd gathered to see Sati Ahilya Devi. In the second picture, Nikhil Deore is joining for wrestling.esakal
Updated on

Dhule News : बोरीस (ता. धुळे) येथील सती अहिल्यादेवीची यात्रा शुक्रवार (ता. ९)पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी ३५ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. इडापीडा टळो व नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जावो, अशी भाविकांनी प्रार्थना केली.

रात्री बारानंतर प्रथम पूजेचा मान म्हणून माहेरचा पहिला आहेर माहेरचे प्रमोद बेहरे, त्यांची पत्नी, गोविंद नामदेव बेहरे, विलास नामदेव बेहरे, चंद्रशेखर मदन पाटील व त्यांची पत्नी व तसेच शेवाडे येथील भगत सदाशिव बुधा धनगर, बोरीस येथील दोधू भिला देवरे व त्यांची पत्नी. (35 thousand devotees at feet of Sati Ahilyadevi in ​​Boris Yatra dhule news)

रोहित रमेश देवरे, राजेंद्र रामदास देवरे, सती अहिल्यादेवी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवरे, मंगलताई देवरे, विलास सुभाष देवरे, अश्विनी विलास देवरे, निखिल सुभाष देवरे ,जिल्हा परिषद अध्यक्षा धरती निखिल देवरे यांनी सहकुटुंब सहपरिवार अहिल्यादेवी महापूजा केली.

यात्रेत जीवनावश्यक वस्तू, करमणुकीची साधने, सौंदर्यप्रसाधने, मसाले, भांडी, उपाहारगृहे, बैलगाडी, लाकडी व पत्र्याची कपाटे आदींच्या विक्रीतून लाखोंची उलाढाल होत आहे. मंदिर प्रशासनाने पाणी, वीज, साफसफाई आदी कामे यापूर्वीच पूर्ण केली.

ग्रामीण भागातील यात्रा असल्याने कुटुंबातून हद्दपार झालेल्या पाटा-वरवंटा, लहान-मोठे जाते, दगडी खलबत्ता, दगडी व लाकडी मुसळ आदी अनेक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

The crowd gathered to see Sati Ahilya Devi. In the second picture, Nikhil Deore is joining for wrestling.
Sati Ahilyadevi Yatrotsav : श्री सती अहिल्यादेवीची आजपासून यात्रा; बोरीसला भाविकांची मांदियाळी

कुस्त्यांचे आकर्षण

यात्रेतील कुस्त्यांचे सामने अखेरपर्यंत रंगले. मातीतील कुस्तीत मल्लांची चपळता व सुरेख डावपेचाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. जिल्ह्याबाहेरील मल्लदेखील सहभागी झाले होते. पाच ते सहा तास कुस्त्या सुरू होत्या.

भांडी व रोख रक्कम मिळून ७५ हजारांहून अधिक रुपये खर्चाचे एकूण बक्षीस देण्यात आले. परिसरातील साडेचारशेहून अधिक मल्ल कुस्तीसाठी आले होते. दीडशेहून अधिक कुस्त्या झाल्या. त्यात २८० मल्लांना संधी मिळाली.

बोरीसचे मल्लांसह न्याहळोद, वार, देवभाने, सायने, नंदाणे, कापडणे, वालखेडा, रामी, पथारे, सरवड, लामकानी, दोंडाईचा, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, मांडळ, वावडे, मुडी, औरंगाबाद, निजामपूर, शिरपूर येथील मल्लांनी भाग घेऊन मोठी भांडी पटकावली.

The crowd gathered to see Sati Ahilya Devi. In the second picture, Nikhil Deore is joining for wrestling.
Dhule News : 7 कोटींतून राज्य उत्पादनची इमारत; आमदार फारूक शाह यांच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.