Nandurbar Cotton Seed : 4 लाख बीटी कपाशीची पाकिटे उपलब्ध; जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई

cotton seeds
cotton seedscotton seeds
Updated on

Nandurbar Cotton Seed : जिल्ह्यात चार लाख बीटी कापसाची पाकिटे उपलब्ध असून, जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी बैठकीत दिला. (4 lakh packets of Bt cotton seeds available nandurbar news)

जिल्ह्यातील सर्व कापूस बियाणे पुरवठादार कंपनी प्रतिनिधींची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी बैठक बोलावून माहिती घेतली. उपस्थित कंपनी प्रतिनिधी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे चार लाख अकरा हजार बीटी कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध झालेली आहेत.

तसेच मागणीनुसार टप्प्याटप्याने बियाणे पुरवठा होणार असल्याचे कंपनी प्रतिनिधींनी सांगितले. शेतकऱ्यांनी कुठल्याही विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता उपलब्ध बियाण्यामधून आपल्या पसंतीचे बियाणे घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे व कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांनी केले. कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर बियाणे कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.

cotton seeds
Cotton Rate News : शेतकऱ्यांना मिळणार वाजवी दरात कापूस बीटी बियाणे

विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांनी अनधिकृत बियाणे विक्री करण्यायावर बियाणे कायद्यानुसार कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कृषी विकास अधिकारी यांनी पुरवठादार कंपन्यांनी पुरवठा करण्यात आलेल्या बियाण्याची डीलरनिहाय माहिती कृषी विभागास देण्याच्या सूचना दिल्या.

जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. तसेच शेतकरी बांधवांनी छापील किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये, तसेच असे गैरप्रकार कुठेही निदर्शनास आल्यास त्वरित कृषी विभागास कळवावे, जेणेकरून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस ई. बी. कदम, एम. जी. विसपुते, वाय. एस. हिवराळे तसेच बियाणे पुरवठादार कंपनी प्रतिनिधी व प्रमुख विक्रेते उपस्थित होते.

cotton seeds
Dhule News : कामे सोडून अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी जलज शर्मांचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.