Dhule News : शिवारात आढळलेली पिल्ले बिबट्याची की रान मांजरीची? वन विभागही संभ्रमात

Chicks found in a maize field in Shiwar
Chicks found in a maize field in Shiwaresakal
Updated on

Dhule News : तऱ्हाडकसबे (ता. शिरपूर) शिवारात भूषण धुडकू वाघ यांच्या शेतात मका कापणी करताना चार लहान पट्टेधारी पिल्ले दिसून आली. (4 small striped cubs at corn harvest are believed to be not leopard cubs but wildcats dhule news)

यापूर्वीच परिसरात बिबट्या, तरस रानडुक्कर पाहिल्याच्या चर्चा होत असताना कापणी करताना ही पिल्ले दिसून आल्याने मजूर घाबरले. शेतमालकाने लागलीच वन विभागाला फोन करून कळविले.

वन विभागातील वनरक्षिका वैशाली कुवर, प्राणिमित्र योगेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिल्लांची काढलेली छायाचित्रे पाहून ही बिबट्याची पिल्ले नसून रानमांजराची असल्याचा अंदाज आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगून परिसराची पाहणी केली व मजुरांना धीर दिला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Chicks found in a maize field in Shiwar
Dhule News : मध्यवर्ती बसस्थानक कात टाकणार; प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

परिसरात चांगल्यापैकी मका लागवड करण्यात आली आहे. शेतीला शेती लागून मका असल्याने परिसरात लपण्यास खूप वाव आहे. ही पिल्ले रानमाजराची असल्याचा प्रथमिक अंदाज असला तरी छायाचित्रातून रानमांजर असल्याचे सिद्ध होत नसल्याने पिकांमध्ये जाऊन शोध घेणे धोक्याचे असल्याचे सांगितले. परिसरात भीतीचे वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी रात्रीतून शेतात जाताना फटाके व मशालीचा वापर करावा, असे आवाहन वनरक्षिका वैशाली कुंवर यांनी केले.

Chicks found in a maize field in Shiwar
Nashik ZP News : जि. प. मध्ये अखेरच्या दिवशी सादर झाली तीनशेवर बिले! मार्चअखेरीची धावपळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.