धुळे : कुसुंबा- मालेगाव (ता. धुळे) मार्गाने दुचाकीवर अवैधरीत्या तलवारी नेणाऱ्या संशयित चौघांना धुळे तालुका पोलिसांनी सोमवारी (ता. ५) सायंकाळी सापळा रचत गजाआड केले. त्यांच्याकडून चार तलवारी हस्तगत केल्या. चौघांवर गुन्हा दाखल केला.(4 who carry swords illegally arrested Dhule Latest Marathi News)
कुसुंब्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या वादग्रस्त मार्गाने संशयित चौघे अवैधरीत्या तलवारी नेत होते. दुचाकीवरून ते जात असल्याची माहिती तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथकाने सापळा रचत शिताफीने संशयित तिघांना पकडले. अन्य एक संशयित दुचाकीसह पसार झाला.
विशाल नाना भिल (रा. अन्वरनाला, पिंप्री शिवार, ता. धुळे), सुनील साहेबराव सोनवणे (रा. एकलव्यनगर, अजनाळे रस्ता, सडगाव, ता. धुळे), विकास प्रकाश मालचे (रा. अमृतनगर, अजनाळे रोड, सडगाव, ता. धुळे) अशी तिघांनी नावे सांगितली. पसार झालेला सुनील नागो भिल (रा. सुभाषनगर, बाळापूर, ता. धुळे) याला पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले.
संशयित चौघांकडून तलवारी हस्तगत केल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सागर काळे, सुनील विंचूरकर, प्रवीण पाटील, अविनाश गहीवड, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतिलाल शिरसाट, राकेश मोरे, योगेश कोळी, मुकेश पवार यांच्या पथकाने केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.