Dhule : ट्रकसह 43 लाखांचा गुटखा LCBने केला जप्त

एलसीबीने जप्त केलेल्या गुटख्या पाहणीवेळी उपस्थित पोलिस अधिकारी व पथक
एलसीबीने जप्त केलेल्या गुटख्या पाहणीवेळी उपस्थित पोलिस अधिकारी व पथकesakal
Updated on

धुळे : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचत मुंबई- आग्रा महामार्गावरील दहिवदजवळ (ता. शिरपूर) ट्रक पकडला. त्यात ट्रकसह ४३ लाखांची तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला. तसेच चालकासह दोघांना ताब्यात घेतले. एलसीबीच्या कामगिरीची पोलिस अधीक्षकांनी आज (ता.४) पत्रकार परिषदेत प्रशंसा केली.(43 lakh gutka along with truck seized by LCB dhule latest news)

राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची आयशरमधून (एमएच १८ बीजी ७६२०) वाहतूक होत असल्याची आणि ते वाहन पळासनेरकडून शिरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकास वाहनाचा शोध घेऊन कारवाईची सूचना दिली.

पथकाला दहीवदपुढे एका हॉटेलजवळ संशयित ट्रक दिसला. त्यास रोखले असता चालक शाकीर जाकीर खान (वय २४), क्लिनर शादाब हैदर खान (वय २५, रा. बामदा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याने पोलिस पथकाला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे दोघांना ताब्यात घेत आयशर धुळे येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणण्यात आला.

एलसीबीने जप्त केलेल्या गुटख्या पाहणीवेळी उपस्थित पोलिस अधिकारी व पथक
Cyber Crime : नाशिक पालिकेचा डेटा चोरण्याचा अमेरिकन हॅकरचा प्रयत्न

तपासणीत दहा लाखांचा ट्रक आणि उर्वरित गुटख्याचा साठा, असा एकूण ४३ लाख ९८ हजार ६४० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनातर्फे शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी अशोक पाटील, संदीप सरग, प्रकाश सोनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एलसीबीने जप्त केलेल्या गुटख्या पाहणीवेळी उपस्थित पोलिस अधिकारी व पथक
Nashik Bribe Crime : Industrial शेड परवानगीसाठी मागितले 30 हजार; एजंटला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()