Nandurbar News : तालुक्यात अचानक आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त भागात महसूल व कृषी विभागाचा पथकाने पंचनामे पूर्ण केले असून तालुक्यात सुमारे ४३६ हेक्टर वरील केळी पिकाचे तर वादळामुळे ९७ घरे व दोन शाळांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अवकाळीसह रविवारी (ता. ४) झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. (436 hectares damaged due to storm in Shahada Panchnama complete Farmers waiting for compensation Nandurbar News)
तालुक्यात गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या वादळामुळे शेतात उभे केळीचे पीक क्षणार्धात आडवे झाले. या दरम्यान पावसाच्या जोर कमी असला तरी काही वेळ आलेल्या या वादळाने रायखेड, म्हसावद, ब्राह्मणपुरी, मंदानेसह अन्य भागात मोठ्या प्रमाणावर फळ बागांसह अन्य पिकांचे नुकसान केले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाहता प्रशासनाने तत्काळ पंचनामे केले. या वादळामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास क्षणार्धात हिरावून घेतला. विशेषतः केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वादळामुळे शेतांमधील उभी केळीचे झाडे जमिनीवर आडवी पडली. तसेच केळीचे घडही इतरत्र फेकले गेले होते. जवळपास ४३६ हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याच्या पंचनामा करण्यात आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अस्मानी संकटात भाव कमी
महागडे रोपे खरेदी करून शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली. लाखोंचा खर्चही केला, परंतु अचानक आलेल्या वादळाने हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
वादळ आले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी केळीची तोडणी करण्यास सुरवात केली होती. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू होते. अशा स्थितीत अचानक वादळ आल्याने सारे काही जमीनदोस्त झाले.
खराब झालेली केळी आता व्यापारी मातीमोल किमतीने घेतील त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट घोंघावत आहे. शेतकऱ्यांना आता खरिपाची चिंता सतावत असून नुकसानीची तत्काळ भरपाई मिळावी अशी मागणी आहे.
तालुक्यात गत रविवारी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतीसह अन्य पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यात ४३६ हेक्टर वरील पिकांचे तसेच ९७ घरांचे व शेल्टी, वाडी पुनर्वसन या दोन शाळांचे पत्रे उडाले आहेत.
दीपक गिरासे तहसीलदार, शहादा
जिल्ह्यात अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची मदत मिळत नाही तोच पुन्हा दुसरी आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवत आहे. शेतकरी पुरता कोलमडला असून शासनस्तरावरून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी.
-अभिजित पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.