Dhule Crime News: साळुंखे खून प्रकरणी 5 अटकेत; दिघी, रतलाम येथे पाठलाग करत एलसीबी पथकाकडून शिकंज्यात

Sanjay Barkund, Kishore Kale, Sachin Hire, Hemant Patil and LCB team were present along with the criminals in custody in the murder case.
Sanjay Barkund, Kishore Kale, Sachin Hire, Hemant Patil and LCB team were present along with the criminals in custody in the murder case.esakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील नवनाथनगरमधील शुभम साळुंखे या तरुणाच्या थरारक खून प्रकरणी पाच गुन्हेगारांना अटक झाली आहे. यात तिघे गुन्हेगार दिघी (पुणे) येथे असताना त्यांना पाठलाग करत येथील एलसीबीच्या पथकाने शिकंज्यात घेतले.

या गुन्ह्यातील संशयित गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तरीही ते मोकाट राहिल्याने त्यांची साळुंखे याचा खून करण्यापर्यंत मजल गेली.(5 arrested in Salunkhe murder case dhule crime news)

या मागच्या कारणांचा शोध घेऊन पोलिस प्रशासन अशा गुन्हेगारांविरुद्ध काय पावले उचलते याकडे धुळेकरांचे लक्ष असेल.

या प्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हेगार पोलिसांचा पाहुणचार घेत आहेत. रविवारी (ता. ८) रात्री पावणेदहा ते मध्यरात्री बाराच्या सुमारास घरावर दगडफेक केल्याबाबत जाब शुभम जगन साळुंखे (वय २६, रा. नवनाथनगर, ५० खोलीजवळ, धुळे) याने घनश्याम ऊर्फ महेश पवार ऊर्फ लाल डोळा याला महात्मा गांधी पुतळ्याजवळ विचारला.

या कारणावरून महेश पवार आणि त्याच्या साथीदारांनी कटकारस्थान करून साळुंखेला हत्यारांसह हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्याला दुचाकीवर बसविले. नंतर वरखेडी रोडवरील मनपा डंपिंग ग्राउंड येथे आणले. धारदार कोयते, लोखंडी रॉड, फाइटने हल्ला चढवून शुभम साळुंखेचा निर्घृण खून केला.

दिघीतून गुन्हेगार ताब्यात

या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हेगारांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पथकाने तत्काळ घटनास्थळी आढावा घेतला. फिर्यादी विनायक साळुंखे याच्याकडे विचारपूस करीत घटनेतील गुन्हेगारांचा शोध सुरू केला.

Sanjay Barkund, Kishore Kale, Sachin Hire, Hemant Patil and LCB team were present along with the criminals in custody in the murder case.
Dhule Crime News : सोनगीर टोलप्लाझावर 33 लाखांचा गुटखा जप्त; 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

फरारी होण्याच्या तयारीतील गणेश अनिल पाटील याला पारोळा रोडवरील कॉटन मार्केटजवळ अटक करण्यात आली. इतर साथीदार फरारी झाले. महेश पवार, जगदीप चौधरी (दोघे रा. स्वामिनारायण कॉलनी, मार्केट यार्ड, धुळे), गणेश साहेबराव माळी (रा. शांतीनगर, ५० खोली) हे तिघे धुळ्यातून नाशिक व तेथून संगमनेरमार्गे पुण्याकडे पसार झाल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली.

त्यानुसार दिघी येथील मॅक्झीन चौकात दुचाकीसह गुन्हेगार दिसल्याची माहिती पथकाला मिळाली. एलसीबी पथकाची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. मात्र, पाठलाग करीत तिघा गुन्हेगारांना दुचाकीसह पकडण्यात आले.

दोघे लक्झरीत

या गुन्ह्यातील आणखी दोन गुन्हेगार अक्षय साळवे आणि जयेश रवींद्र खरात ऊर्फ जिभ्या राजस्थानकडे पसार झाल्याची माहिती एलसीबीला मिळाली. पथकाने राजस्थानला त्यांचा शोध सुरू केला.

मात्र, हे दोघे अजमेरकडून इंदूरकडे लक्झरीने येत असल्याची माहिती एलसीबीच्या हाती लागली. मध्य प्रदेशातील रतलाम येथे एलसीबीच्या पथकाने लक्झरी बसची तपासणी सुरू केली. एका बसमध्ये अक्षय साळवे आणि जयेश खरात आढळले. त्यांना अटक करण्यात आली.

Sanjay Barkund, Kishore Kale, Sachin Hire, Hemant Patil and LCB team were present along with the criminals in custody in the murder case.
Dhule Crime News : खूनप्रकरणी पुतण्याला जन्मठेप; कलमाडीतील घटनेप्रकरणी न्या. बेग यांचा निकाल

मारेकऱ्यांवर विविध गुन्हे

गुन्हेगार महेश पवार याच्याविरुद्ध १५, अक्षय साळवे याच्यावर नऊ, गणेश माळी याच्याविरुद्ध दोन, जगदीश चौधरी याच्याविरुद्ध चार, तर जयेश खरात याच्याविरुद्ध १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत आहे.

सहा गुन्हेगारांना पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमलजित मोरे, संजय पाटील, हवालदार संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, रविकिरण राठोड, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, सुशील शेंडे, शशिकांत देवरे, जितेंद्र वाघ, मुकेश वाघ, योगेश साळवे, अमोल जाधव यांनी बेड्या ठोकल्या.

Sanjay Barkund, Kishore Kale, Sachin Hire, Hemant Patil and LCB team were present along with the criminals in custody in the murder case.
Dhule Crime News : खूनप्रकरणी पुतण्याला जन्मठेप; कलमाडीतील घटनेप्रकरणी न्या. बेग यांचा निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.