Child Marriage : 4 दिवसांत रोखले तब्बल 5 बालविवाह! नंदुरबार पोलिसांकडून मोहीम अधिक तीव्र

child marriage
child marriagesakal
Updated on

Child Marriage : नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे बालविवाह रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन अक्षता मोहिमेचे फलित खऱ्या अर्थाने समोर येऊन लागले आहे.

राज्यातील हा इतरासांठी आदर्शवत ठरावा असा उपक्रम आहे. जिल्ह्यात चार दिवसांत पाच बालविवाह रोखून पालकांचे समुपदेशन करीत बालविवाह विरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे. (5 child marriages prevented in 4 days Campaign intensified by Nandurbar police news)

मोलगी व अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना १३ मेस स्थानिक नागरिकांकडून गुप्त माहिती मिळाली होती. मोलगी पोलिस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबीय नियोजन करीत आहेत व अक्कलकुवा तालुक्यातील निंबापाटी गावाच्या राऊतपाडा येथील अल्पवयीन मुलींचा १३ मेसच विवाह होणार असल्याचे समजले.

घटनेची माहिती मोलगी व अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांना कळविल्याने त्यांनी दोन्ही बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशित केले.

मोलगी पोलिस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात अल्पवयीन मुलीचा विवाह भगदरी (ता. अक्कलकुवा) येथील तरुणासोबत निश्चित

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

child marriage
Karnataka Result: अखेर डी. के. शिवकुमार सुद्धा दिल्लीला निघाले, मुख्यमंत्रीपदावर होणार निर्णय

करण्यात आला होता; परंतु मोलगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार यांनी अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांचे व गावातील नागरिकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करून मनपरिवर्तन केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांना

ही बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. अल्पवयीन मुलीच्या पालकांना मोलगी पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.

अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीतील निंबापाटी राऊतपाडा येथे जाऊन अक्कलकुवा पोलिनस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावित यांनी माहिती घेतली

असता तेथे अल्पवयीन मुलीचा वालंबा गावातील तरुणासोबत विवाह निश्चित करून १३ मेस होणार होता, परंतु श्री. गावित यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाइकांचे समुपदेशन करून मनपरिवर्तन केले.

तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना अक्कलकुवा पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली. त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

child marriage
Nashik: जमावाकडून त्र्यंबकेश्र्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न, नेमका प्रकार काय? सविस्तर जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.