Nandurbar News : जिल्ह्यातील तापी काठच्या प्रतीकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिर परीसरातील घाटांना आणि रस्त्यांना सुशोभीकरणाचा नवा 'लुक' दिला जाणार असून प्रकाशा शहरातील रस्त्यांचा देखील नव्याने विकास केला जाणार आहे.
त्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यासाठी पाठपुरावा केला.(5 crore fund for roads beautification for prakasha nandurbar news)
जिल्ह्यातील तापी काठावरील प्रतीकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले जाणार असून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने त्याचा आराखडा निश्चित केला आहे. त्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच त्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रकाशा येथे केदारेश्वर मंदिर परिसराला भेट देत घाटांचे, रस्त्यांचे आणि स्मशानभूमीचे आराखडे अधिकाऱ्यांकडून समजून घेतले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्रभाई पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहादा येथील कार्यकारी अभियंता मयूर वसावे, आकाश पाटील, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
या कामांना मिळणार प्राधान्य
मंजूर पाच कोटींरुपये निधीतून परिसरातील रस्ते त्याचबरोबर या नदीकिनारी व घाटाच्या बाजूला सर्व बसण्याची व्यवस्था केली जाईल. मंदिर परिसरातील विक्रेत्यांची व्यवस्था होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशस्त कॉम्प्लेक्स उभारणे, परिसराला सुशोभित करू शकणाऱ्या विद्युत दिव्यांची उभारणी करणे यासारख्या कामांचाही त्यात समावेश राहील.
घाटावर विविध प्रकारच्या विधीसाठी येणाऱ्या भाविकांना वस्त्रे बदलण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्मशानभूमी देखील विकसित केली जाणार असून तिथपर्यंत जाण्यासाठीचे पक्के रस्ते केले जातील. तसेच प्रकाशा शहरातील रस्ते विस्तारित करण आणि सिमेंट-काँक्रिटीकरण करणे याबरोबरच शहादा व नंदुरबार कडे जाणाऱ्या प्रकाशा येथील रस्त्यांचे नवनिर्माण करणे अशा कामांचाही समावेश करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.