Dhule News : रस्त्यांसह विकासकामांसाठी शहरास पावणेसहा कोटींचा निधी : आमदार शाह

fund
fundsakal
Updated on

Dhule News : रस्त्यांसह विकासकामांसाठी नगरविकास आणि अल्पसंख्याक विभागाकडून पावणेसहा कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.

त्यातून विविध भागातील कामांना चालना मिळणार आहे, अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली. (5 crore sanctioned to city for development works including roads dhule news)

शहरातील सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या कॉलनी, झोपडपट्टी व अन्य भागात रस्ते नसल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात अधिक त्रास सहन करावा लागतो. या अनुषंगाने पीडित नागरिकांनी रस्ते विकासाची मागणी केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाच कोटींच्या निधीची मागणी केली. त्यास मंजुरी मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभाग ११ मधील अंबिकानगर, याच प्रभागात शकील अन्सारी यांच्या घरापासून मशीद शिराजुद्दारीपर्यंत, प्रभाग सहामधील आधारनगर, प्रभाग पाचमधील मुक्ताईनगर, प्रभाग सातमधील भीमवाडी ते शाहीर शाहिद शाह यांच्या घरापर्यंत, प्रभाग पंधरामधील सत्यसाईबाबा सोसायटी, प्रभाग बारामधील पुरुष प्रसाधनगृहापासून, प्रभाग बारामध्ये रहमत कॉलनी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fund
Dhule News: 128 कोटी उत्पन्नात ‘थकबाकी’च भारी! मालमत्ता कर, पाणीपट्टीतून मिळणारे अपेक्षित उत्पन्न

प्रभाग पाचमधील जानकीनगर, प्रभाग पाचमधील दौलतनगर, प्रभाग अकरामधील मुस्ताक खाटीक ते दिलावर पिंजारी, प्रभाग एक, प्रभाग १९ मधील कुल कबीर येथे रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाग पाचमध्ये रामनगर पाण्याची टाकी परिसरात काँक्रिटीकरण, प्रभाग दोनमधील श्रीहरीनगर तसेच प्रभाग १९ मधील बंदी नवाजनगर येथे काँक्रिटीकरण, प्रभाग दोनमध्ये न्यू एकतानगर, प्रभाग तीनमध्ये मज्जिद-ए-तैयबा, प्रभाग पाचमध्ये भरतनगर, प्रभाग १९ मधील बोरसे कॉलनीत रस्त्यांची कामे लवकरच प्रशासकीय प्रक्रियेनंतर सुरू होतील.

अल्पसंख्याक विभागाकडून मोगलाई कब्रस्तानाच्या कामासाठी ५० लाख, तर जुने धुळे कब्रस्तानासाठी २५ लाखांचा निधी पाठपुराव्याअंती मंजूर झाल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली.

fund
Dhule Farmer Union Election : शेतकी संघावर ‘बळीराजा’चे वर्चस्व; हर्षवर्धन दहिते यांच्या पॅनलने 9 जागा जिंकल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.