Dhule News : बोपखेल ग्रामपंचायतीचे 5 सदस्य अपात्र; कामाचा ठेका अन् खात्यावर रक्कम वर्ग प्रकरण भोवले

court order
court orderesakal
Updated on

Dhule News : बोपखेल (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांवर ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेऊन त्याची रक्कम आपल्या खात्यात वर्ग केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (5 members of Bopkhel Gram Panchayat disqualified dhule news)

बोपखेल (ता. साक्री) ही आठसदस्यीय ग्रामपंचायत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ही बॉडी गठित झाली होती. मात्र तक्रारदार जितेंद्र भिवा कुवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता.

यात म्हटले होते, की जामनाबाई मगन कुवर, संजय बाबा वळवी, रामचंद्र लखू कुवर, दीपक सुक्राम पवार, विलास माल्या वळवी हे बोपखेल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असून, त्यांनी त्यांच्या सदस्यपदाच्या कार्यकाळात पेसा योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्यांचे व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयाचे ठेके घेऊन स्वतः काम केलेले आहे व त्या कामांचा मोबदला स्वतःच्या नावाने धनादेशाद्वारे ग्रामंपचायतीच्या खात्यातून प्राप्त केलेला आहे.

या ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध प्रत्यक्ष हितसंबंध असून, स्वतः कामाचा ठेका घेत असल्याचे दर्शवून संबंधित सदस्यांच्या नावे पुराव्यानिशी धनादेश वठवून रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग झाल्याचे पुरावे सादर केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

court order
Traffic Signal Fine : सिग्नल्सवर बेशिस्तांचे फाटणार ‘चलान’! ‘सीसीटीव्ही’चा आजपासून वॉच

त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपात्र घोषित करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी अर्जाद्वारे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात करण्यात आली. अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात कागदपत्रांची पडताळणी केली असता

संबंधित ग्रामपंचयत सदस्यांनी स्वतःच्या नावे ठेके घेऊन ग्रामपंचयत अधिनियमाच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत ग्रामपंचयत अधिनियम १९५९ च्या कलम १४ (ग)नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी करून त्यांना अपात्र घोषित करत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले व संबंधित आदेश साक्री तहसीलदारांमार्फत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याआधी सहा महिन्यांपूर्वी बोपखेल लोकनियुक्त सरपंच सुमित्रा कुवर यांच्यावर अविश्वास आणल्यामुळे उपसरपंच हेच सरपंचांचा प्रभारी म्हणून पदभार सांभाळत आहेत.

ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याने धुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर संबंधितांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार की ग्रामपंचायतीवर प्रशासक राज येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

court order
Nashik Unseasonal Rain Damage : काटवन परिसरात कांदापीक पाण्यात; अवकाळीचा पुन्हा तडाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.