Dhule Accident News : कोळशापाणी गावावर शोककळा; 5 मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...

Death News
Death Newsesakal
Updated on

Dhule Accident News : शिरपूर तालुक्यातील पळासनेरपासून पाच किलोमीटरवर मोहिदा ग्रामपंचायतींतंर्गत कोळशापाणीपाडा २७० लोकसंख्या असलेले आदिवासी पावरा समाजाचे गाव. (5 persons dead in accident from kolashapani village dhule news)

या गावातील कुटुंब कोरडवाहू शेती व्यवसाय व मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात. गावात जिल्हा परिषद मराठी शाळा पहिली ते चौथीपंर्यत आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना बाहेरगावी आश्रमशाळेत किंवा वसतिगृहात पाठवितात.

मंगळवारी (ता. ४) सकाळी कोळशापाणी येथील काही मुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, देवपूर, धुळे येथे शिक्षण घेत होते. त्यांना शाळेत पोचविण्यासाठी पळासनेर चारणपाडा येथे थांबले असता साडेदहाला काही कळण्याचा आतच काळाचा आघाताने घात केला.

ट्रकच्या धडकेने चिरडून नऊ जणांच्या अक्षरक्षा: चिंधड्या उडाल्या. या घटनेत दहा जणांचा बळी गेला, तर २८ जण जखमी झाले. या अपघातात अवघ्या कोळशापाणी येथील पाच जणांचा मृत्यू, तर सहा जखमी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Dhule Accident News : आम्हाला वाचवा हो, पाणी द्या हो...! जखमींच्या मदतीसाठी याचना....

अपघातात या पाड्यातील चार कुटुंबांना हादरा बसला. कर्ती माणसे आणि उमलणारी कोवळी बालके अपघातात मृत्यूच्या कुशीत विसावली. पाड्यातील ही मरणासन्न अवस्था जिवाला चटका लावणाऱ्या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूची सर्व परिचीत माणसे कुटुंबाचे सांत्वन करायला आली.

घराघरासमोर हंबरडा फोडणाऱ्या महिला दिसत होत्या. ‘आई-बाबा, तुम्ही मला शाळेत पोचविण्यासाठी आलात आणि स्वतः देवाघरी गेलात’ असा एकच हंबरडा फोडणाऱ्या मुलीचा आवाज वातावरण अधिक भयाण करत होता. हे दृश्य सर्वांना विचलित करत होते.

कोळशापाणी येथील मृतांची नावे ः संजय जायमल पावरा (वय ३२), गुरी सुरसिंग पावरा (३१), निर्मला तेरसिंग पावरा (१३), रितेष संजय पावरा (१३), पंकज पिंटू पावरा (९). जखमींची नावे ः सुमित्रा पिंटू पावरा (३५), गीता गुरी पावरा (१४), अर्जुन तेरसिंग पावरा (१३), बबिता संजय पावरा (१२), नंदणी पिंटू पावरा (१५), अजय तेरसिंग पावरा (१८).

Death News
Dhule Accident News : चारणपाडा अपघाताने हळहळले समाजमन; समाज माध्यमांवर मदतीची दर्शविली तयारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.