दोंडाईचा (जि. धुळे) : दोंडाईचा-नंदुरबार महामार्गालगत असलेल्या धावडे (ता शिंदखेडा) शिवारात एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या पाच तलवारी पोलिसांना आढळल्या आहेत. पोलिसांनी तलवारी जप्त करून आरोपीस अटक केली. (5 swords seized from hotel in Dhwade Shivarat Arrested one dhule Latest Crime News)
जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशान्वये विशेष कारवाईचे सत्र सध्या जिल्ह्यात सुरू आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणूक तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, फरारी आरोपी, पाहिजे असलेले आरोपी, तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे.
पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार धावडे गावाच्या पुढे दोंडाईचा-नंदुरबार रस्त्याच्या बाजूला हॉटेल जायकामध्ये हर्षल देवीसिंग गिरासे (वय ३०, रा. पथारे, ता. शिंदखेडा) हा अवैधरीत्या तलवारीसारखे शस्त्र बाळगून आढळल्याने हवालदार अनिल दादाभाई धनगर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
त्याच्याकडे पाच हजार रुपये किमतीच्या पाच लोखंडी पात्याच्या धारदार तलवारी आढळल्या. ‘सिरोही की तलवार पचास साल की गॅरंटी’ असे पात्यावर लिहिले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांच्या पथकातील प्रेमराज पाटील, विश्वेश हजारे, पंकज ठाकूर, अनिल धनगर, मुकेश भिल यांनी हॉटेल जायकाची पंचांसमक्ष झडती घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.