Dhule : गुंतवणूकदारांची 56 कोटींत फसवणूक; धुळे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Suspects detained by police.
Suspects detained by police.esakal
Updated on

धुळे : धुळ्यासह जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे चार हजार ४०० गुंतवणूकदारांकडून जाहिरातीच्या आधारे गोळा केलेली तब्बल ५६ कोटींच्या रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी शुकूल वेल्थ अ‍ॅडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाऊंडर, डेलीगेट फर्मच्या दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील स्थानिक दोघा प्रतिनिधींना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. १४) अटक केली. (56 crore defrauding of investors Action by Dhule Economic Offences Branch Dhule Latest Marathi News)

गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ७६ कोटी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. त्यातून खानदेशातील गुंतवणूकदारांची निव्वळ ५६ कोटींची रक्कम स्थानिक प्रतिनीधींच्या माध्यमातून व त्यांनी केलेल्या जाहिरातीच्या आधारे गोळा झाली. तसेच गुंतवणुकीतील एक कोटी ४० लाख ५० हजार ५०८ रोखीत फसवणूक झाल्याने प्राथमिक तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

रवींद्र निंबा नेरकर (रा. राणीपुरा, गणपती मंदिराजवळ, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) या गॅरेज व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना, धनंजय बराड, देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल (सर्व रा. सुरत) यांनी शुकूल वेल्थ अ‍ॅडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाऊंडर, डेलीगेट या फर्मची स्थापना केली.

या माध्यमातून मंगेश नारायण पाटील, आकाश मंगेश पाटील (दोघे रा. जयहिंद कॉलनी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. फर्मच्या संशयित सहा जणांनी पूर्वनियोजीत कटातून वेळोवेळी जाहिरात करून फर्ममध्ये पैसे गुंतविल्यास प्रतिमाह आठ ते नऊ टक्के दराने आकर्षक परतावे मिळतील, असे आमिष दाखवून ठेवीदारांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. यात गुंतवणुकदारांची तब्बल एक कोटी ४० लाख ५० हजार ५०८ रूपयांची फसवणूक झाली.

आर्थिक गुन्हे शाखेने दोंडाईचा आणि सुरत येथे सापळा रचून स्थानिक प्रतिनिधी मंगेश नारायण पाटील याला दोंडाईचा येथून, तर आकाश नारायण पाटील याला सुरत येथून बुधवारी (ता. १४) अटक केली. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक विजय जाधव, निरीक्षक हेमंत बेंडाळे, हर्षवर्धन बहिर, हिरालाल ठाकरे, गयासुद्दिन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, नितीन चव्हाण, मनोज बाविस्कर, राजीव गित आदींनी ही कारवाई केली.

Suspects detained by police.
Bribe Crime : निमगाव वाकडा केंद्रातील आरोग्य सेवकास लाच घेताना अटक

खानदेशातील ४ हजार ४०० जणांना फटका

या प्रकरणात खानदेशातील सुमारे चार हजार ४०० गुंतवणूदारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्याच्या तपासात फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. मुख्य संशयिताचा शोध सुरू आहे.

हा प्रकार २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरु होता. वेळोवेळी पैशांचा तगादा लावूनही उडवाउडवीचे उत्तर एजंटकडून मिळत होते. त्यामुळे अखेर फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांपैकी रवींद्र नेरकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार कंपनीच्या चार जणांसह दोन कलेक्शन एजन्टविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

"वित्तीय फर्ममध्ये पैसे गुंतवले तर आकर्षक व्याजदर मिळेल, अशी बतावणी करुन अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार गंभीर आहे. शुकूल वेल्थ अ‍ॅडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाऊंडर, डेलीगेट या फर्मद्वारे कोणी पीडित असल्यास किंवा कुणाची फसवणूक झाली असेल त्यांनी गुन्ह्याचे तपास अधिकारी हर्षवर्धन बहिर किंवा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक विजय जाधव यांच्याशी संपर्क साधावा."

- प्रवीणकुमार पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे

Suspects detained by police.
Nashik : सफरिंग प्रमाणपत्रासाठी पोलीस ते सिविल रॅकेट उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.